कोपरगाव शहर वृत्त
नगरपरिषदेत…या नेत्याचा सक्रियपणा वाढणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ झाली असून कोपरगावकरांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्याची संधी साधत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव पालिकेत आपला सक्रियपणा वाढवला असल्याचे मानले जात आहे.संधी साधत आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.

“कोपरगाव शहराच्या नागरीकांना सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे.कोपरगाव शहराची स्वच्छता व्यवस्थित करावी.शहरातील प्रत्येक प्रभागात समप्रमाणात व उच्च दर्जाचे विकासकामे झाली पाहिजे.ज्या प्रभागात विकासकामे बंद पडले आहेत त्या कामांना तातडीने सुरुवात करा”-आ. आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक संपली असून 21 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निकालात भाजप कोल्हे गटाला नगराध्यक्षपदी पराग संधान यांची वर्णी लागली आहे.तर त्यांच्या वाट्याला १९ जागा आल्या आहेत.यात शिवसेनेने हाती छत्री घेऊन चार जागा वाट्याला आल्या असून एक अपक्ष उमेदवाराला संधी दिली होती.दरम्यान राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाला मागील ०१ जागांत भरघोस वाढ होऊन त्या ११ वर पोहचल्या आहेत.त्यामुळे आता दोन्ही गटांना स्वीकृत नगरसेवक निवडीसह सत्ताधारी गटाला उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाचे गळ्यात घालायची असा प्रश्न पडला आहे.त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.उमेदवारी दिनाक १२ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे.आता दोन्ही गट प्रबळ दावेदार झाल्याने आ.काळे हे पहिल्यापेक्षा नगरपरिषदेत जास्तीचे लक्ष देणार असे दिसू लागले आहे.या पार्श्वभूमीवर आज आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयास आपल्या समर्थक नगरसेवकांच्या उपस्थितीत भेट दिली असता या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रवादी आ.आशुतोष काळे गटाला मागील ०७ जागांत भरघोस वाढ होऊन त्या ११ वर पोहचल्या आहेत.त्यामुळे आता आगामी कालखंडात ते आपल्या समर्थकांसह अधिकची ताकद लावणार असे संकेत मिळत आहेत.त्यामुळे आगामी पाच वर्षाचा कालखंड कोपरगावकरांना धामधुमीचा राहणार असे दिसत असल्याने त्यांनी आपल्या मनाची तयारी केलेली उत्तम.
यावेळी पार पडलेल्या बैठकीत,”कोपरगाव शहराच्या नागरीकांना सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे.कोपरगाव शहराची स्वच्छता व्यवस्थित करावी.शहरातील प्रत्येक प्रभागात समप्रमाणात व उच्च दर्जाचे विकासकामे झाली पाहिजे.ज्या प्रभागात विकासकामे बंद पडले आहेत त्या कामांना तातडीने सुरुवात करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिल्या आहेत.या वरून आगामी काळात कोल्हे गटाच्या ताब्यात गेल्याने आ.काळे यांचा अधिकचा सक्रियपणा कोपरगाव पालिकेत वाढणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पाचही वर्षे आगामी काळात कोपरगावात मोठा कोलाहल दिसून येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे,नूतन नगरसेविका माधवी वाकचौरे,नगरसेवक मेहमूद सय्यद,निर्मला आढाव,स्मिता साबळे,इम्तियाज अत्तार,वाल्मिक लाहीरे,राहुल शिरसाठ,सोनम त्रिभुवन,सोनाली कपिले,फकीर कुरेशी,रमेश गवळी,आदीसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.



