जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नूतन नगराध्यक्षांनी केली पाणी योजनेची पाहणी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव शहराला भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच शहराच्या पाणी व्यवस्थापनाची पाहणी करून पाणी नियमित येण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांनी शहरातील तलाव तसेच जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देत त्यांनी पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली आणि आवश्यक त्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे.त्यामुळे शहर वासियाचे त्यांच्या पाणी धोरणाकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच शहराच्या पाणी व्यवस्थापनाची पाहणी केली तो क्षण.

   

कोपरगाव नगरपरिषदेच्या तलाव क्रमांक एक ते पाचची सविस्तर पाहणी करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शहराच्या मूलभूत प्रश्नांवर कृती करत नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे दिसून आले आहे.आगामी काळात त्यांची पावले नेमकी कोणत्या दिशेने व कोठे पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

    कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर मानला जातो.या आधीही अनेक सत्ताधाऱ्यांनी या बाबत आश्वासने दिली होती.मात्र ती हवेत विरली आहेत.कोपरगाव शहराला पूर्वी गोदावरी डाव्या कालव्यातून 5.96 द.ल.घ.मी.पाणी मंजुरी होती.त्यातील 40 टक्के पाणी वापरले जात नव्हते.तरीही जलसंपदा विभागाकडून नवीन पाणी जवळपास 2.30 द.ल.घ.मी.पाणी आ.आशुतोष काळे यांनी मंजूर केले आहे.या शिवाय पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी त्यांनी आणि पाच क्रमांकाच्या तलावाचा आग्रह काही वर्षापासून धरला जात होता.तो पूर्ण झाला आहे.मात्र अद्याप दररोज पाणी उपलब्ध झालेले नाही हे विशेष ! मध्येच काहीनी निळवंडे धरणाची पिपाणी वाजवली होती असो.कोपरगाव शहराची खरी समस्या सदोष पाणी वितरण व्यवस्था,पाणी चोरी,चोवीस,अठरा,दहा,आठ तासांच्या नळजोडण्या आहेत.सन-2011 साली संजय सातभाई अध्यक्ष असताना त्यांनी नांदुर मध्यमेश्वर वरून बंदिस्त जल वाहिनी करण्याचे प्रस्तावित केले होते.मात्र काहींनी ती योजना हाणून पाडली होती.त्यानंतर 2014 साली तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सातभाई यांच्या पाठपुराव्यातून केंद्रातून पाणी योजनेला परिपूर्णता आणण्यासाठी 42 कोटी रुपये मंजूर केले होते.तो निधी अद्याप कोणालाही सापडलेला नाही हे विशेष ! शहराच्या भूमिगत विद्युत व्यवस्थेसारखा तो निधी कुठे गायब करण्यात आला ते अद्याप कोणालाही सापडलेला नाही.तशीच या योजनेची अवस्था.त्यावेळी कोणी बिले काढण्यासाठी किती हात ओले केले यावर पालिका सभागृहात खूप मोठे महाभारत आणि रामायण घडले गेले आहे.

 

सन-2011 साली संजय सातभाई अध्यक्ष असताना त्यांनी नांदुर मध्यमेश्वर वरून बंदिस्त जल वाहिनी करण्याचे प्रस्तावित केले होते.मात्र काहींनी ती योजना हाणून पाडली होती.त्यानंतर 2014 साली तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सातभाई यांच्या पाठपुराव्यातून केंद्रातून पाणी योजनेला परिपूर्णता आणण्यासाठी 42 कोटी रुपये मंजूर केले होते.तो निधी अद्याप कोणालाही सापडलेला नाही हे विशेष !

   कोपरगाव शहराच्या पाण्याच्या दुर्दशेचे अवतार अनेक वर्षे शहराने पाहिले आहेत.त्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.गोदावरी नदी उशाला असताना व शेताला वळसा घालून जात असताना शहराच्या घशाला कोरड दिसत आली आहे.आता मागील वीस डिसेंबर रोजी निवडणूक संपन्न झाली असून एकवीस तारखेला मतमोजणी संपन्न होऊन नगराध्यक्षपदी माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचे समर्थक व नातेवाईक पराग संधान हे विराजमान झाले आहे.त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


 
   कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत भेडसावणाऱ्या समस्या कशा कमी करता येतील,पाण्याचे नियोजन अधिक प्रभावी कसे करता येईल आणि भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील यावर नगराध्यक्ष संधान यांनी विशेष भर दिला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यावर अथवा आपल्या कार्यभार स्वीकारल्यावर त्यांची भूमिका समोर येणार आहे.त्याकडे खरे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोपरगाव शहराचा नूतन साठवण तलाव.

   दरम्यान यापूर्वीच सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांची प्रभावी सुरुवात केली असल्याचे मानले जात आहे.त्या कार्याची पुढची पायरी म्हणून नगराध्यक्ष पराग संधान यांनी पाणी व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करत अपेक्षित कामांना सुरुवात केल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

   या पाहणी दरम्यान नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह नगरसेवक वैभव आढाव,गटनेते प्रसाद आढाव,सर्व नगरसेवक जितेंद्र रणशूर,स्वप्निल मंजुळ,आकाश वाजे,रवींद्र कथले, संजय उदावंत,कैलास मंजुळ,फिरोज पठाण,दत्तात्रय पगारे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच बांधकाम,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

   कोपरगाव नगरपरिषदेच्या तलाव क्रमांक एक ते पाचची सविस्तर पाहणी करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शहराच्या मूलभूत प्रश्नांवर कृती करत नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे दिसून आले आहे.आगामी काळात त्यांची पावले नेमकी कोणत्या दिशेने व कोठे पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close