कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरातील…या चौकाचे नामकरण होणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहराचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक स्व.जंगुशेठ (उत्तमचंद)अजमेरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमान गोकुलचंद विद्यालयानजिक असलेल्या चौकास त्यांचे नामकरण देण्याचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या सोमवार दि.०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली आहे.

सदर कार्यक्रमास तालुक्याचे आ.आशुतोष काळे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी-परजणे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिन अजमेरे यांनी केले आहे.



