जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरात आणखी व्यापारी संकुल उभारणार-…या नेत्यांचा दावा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव शहरात व्यापारी मोठ्या प्रमाणावर असून त्यांची व्यापारी संकुलाची मागणी आपण आगामी काळात पूर्ण करणार असून उर्वरित रस्तेही मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

 

  कोपरगाव शहरात राज्य परिवहन मंडळाचे जागेत काही दिवसापूर्वी आ.काळे यांनी धारणगावरोड लगत व्यापारी संकुल मंजुर केले होते त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना त्यांनी ३.३६ कोटी रुपयांचे एक व्यापारी संकुल मंजूर केलं आहे.त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेनजीक इमारतीच्या ईशान्येस असलेल्या जागेत २८ गाळ्यांचे आणखी एक व्यापारी संकुल मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन आज सकाळी १०.३० वाजता आ.आशुतोष काळे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,जिल्हा युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,माजी गट नेते विरेन बोरवके,नगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार,रमेश गवळी,नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक पूनम पंडित,सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ,रचना सहाय्यक किरण जोशी,रश्मी प्रधान,सचिन गवारे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,राजेंद्र शिरोडे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,आदीसह बहुसंख्येने नागरिक व आगामी नगरपरिषद निवडणूक उच्छुक उमेदवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आ.काळे यांनी विविध रस्ते,गटारी आदींचे भूमिपूजन केले आहे.

प्रस्तावित व्यापारी संकुल.

या कार्यक्रमानंतर आ.काळे यांनी विविध रस्ते,गटारी आदींचे भूमिपूजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close