जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात पुन्हा व्यापारी संकुल होणार-गोड बातमी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपरिषद इमारती समोर आणखी एक व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

   

कोपरगाव शहरात राज्य परिवहन मंडळाचे जागेत काही दिवसापूर्वी आ.काळे यांनी धारणगावरोड लगत एक व्यापारी संकुल मंजूर केलं आहे.त्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यातच आणखी व्यापाऱ्यांना एक गोड बातमी आली असून त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेसमोर आणखी एक व्यापारी संकुल मंजूर केलं असल्याचा दावा शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केला आहे.हा खरा किती आणि खोटा किती आगामी काळात उघड होणार आहे.

   कोपरगाव शहरातील सुमारे दोन हजार अतिक्रमणे दिनाक १० मार्च २०११ रोजी काढल्यानंतर स्थानिक नेते आणि पुढाऱ्यांनी अनेक निवडणुकांच्या पोळ्या भाजून घेतल्याचे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी पाहिले आहे.मात्र चौदा वर्षे उलटूनही हा प्रश्न सुटलेला नाही.त्यामुळे नागरिकांचा या व्यवस्थेवर असलेला विश्वास उडत चालला आहे.कोपरगाव शहरात राज्य परिवहन मंडळाचे जागेत काही दिवसापूर्वी आ.काळे यांनी धारणगावरोड लगत एक व्यापारी संकुल मंजूर केलं आहे.त्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यातच आणखी व्यापाऱ्यांना एक गोड बातमी आली असून त्यांनी कोपरगाव नगरपरिषदे समोर आणखी एक व्यापारी संकुल मंजूर केलं असल्याचा दावा केला आहे.हा खरा किती आणि खोटा किती आगामी काळात उघड होणार आहे.कारण या पूर्वी येवला नाका येथील बंदिस्त नाट्यगृह,धुळमुक्त रस्ते,मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन,पिण्याचे दररोज गोड पाणी हा जिताजागता पुरावा आहे.त्याच्या घोषणा ऐकून नागरिक थकून भागून गेले आहे.

   दरम्यान सुनील गंगुले यांच्या म्हणण्यानुसार आगामी सोमवार दि.०७ जुलै रोजी कोपरगाव नगरपरिषद इमारती समोर या व्यापारी संकुलाची पायाभरणी होणार असून या कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close