कोपरगाव शहर वृत्त
…या समाजाचे सांस्कृतिक भवन लक्षवेधी-आ.काळे
न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नव्याने तेली समाजाच्या सहकार्यातून बांधण्यात आलेले संत जगनाडे महाराज यांचेसह सांस्कृतिक भवन कोपरगाव शहराची शोभा वाढविणार असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
कोपरगाव येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज,श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा,सांस्कृतिक भवन उदघाटन सोहळा व तेली समाज संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी आ.काळे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी तेली समाजाचे नेते सोमाभाई मोदी,प्रांतिक तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खा.रामदास तडस, माजी आ.स्नेहलता कोल्हे,कोषाध्यक्ष गजानन शेलार,महासचिव भूषण कर्डीले,संत जगनाडे महाराजांचे चौदावे वंशज जनार्दन जगनाडे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र झावरे,बाळासाहेब लुटे,जगन्नाथ गाडेकर,प्रदीप कर्पे,जगदीश वैद्य, सुनिल चौधरी,नरेंद्र चौधरी,भागवत लुटे,रविंद्र कर्पे,चंद्रकांत वाव्हळ,कचरु वेळंजकर, संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तौलिक तेली समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी खा.रामदास तडस यांनी समाजाचे कौतुक करून कोपरगाव शहरातील समाज बांधवांनी महाराष्ट्रातील समाज बांधवांना दिशा देण्याचे काम केले आहे. यापुढे देखील समाज कोपरगाव शहरातील समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले आहे.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी तर आभार युवराज सोनवणे यांनी मानले आहे.