कोपरगाव शहर वृत्त
…या विद्यार्थ्यांची गोदाकाठ महोत्सवास भेट
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने के.जे सोमैया महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह आज गोदाकाठ प्रदर्शनास भेट दिली आहे.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विपणन कौशल्य,उद्योगाची स्थानिक बाजारपेठ,अर्थसहाय्य उपलब्धता याविषयी प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन संबंधित उद्योजकांशी संवाद साधला.विविध बचत गटांच्या स्टॉल धारकांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.बचत गटातील महिलांचे संघटन करून त्यांना रोजगार कसा उपलब्ध केला जातो तसेच त्यांच्या उत्कर्षासाठी कसे प्रयत्न केले जातात याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली आहे.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव द्वारे आयोजित गोदाकाठ महोत्सवातील विविध कृषी प्रदर्शन व महिला बचत गटांनी तय्यार केलेल्या मालाचे प्रदर्शन पाहून विद्यार्थी भारावून गेले तसेच अनेक वस्तूंची त्यांनी खरेदी केली आहे.
सदर प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ.विजय ठानगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्या समवेत वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एस.आर.पगारे,डॉ.एस.एल.अरगडे,प्रा.धनवटे, प्रा.गुंजाळ, प्रा.रणधीर,प्रा.सोमासे व प्रा.गाडे उपस्थित होते.