कोपरगाव शहर वृत्त
नाहक बदनामी विरुध्द दावा ठोकू-…या नेत्यांचा इशारा !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली असेल तर दोषीं व्यक्ती कोणीही असो त्यावर कारवाई झालीच पाहिजे यात आम्ही प्रशासनात हस्तक्षेप करणार नाही मात्र आगामी निवडणूक पाहून कोणी विनाकारण आमची बदनामी करणार असेल तर आम्ही अशा प्रवृत्ती विरुध्द दावा ठोकला जाईल असा स्पष्ट इशारा कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना सोमवार दिनांक 09 व 19 सप्टेंबर 2024 रोजी लागोपाठ घडली आहे.खडकित तलवारी सापडल्या आहेत.तर गोळीबारातील एक आरोपी तनवीर रंगरेज हा गंभीर जखमी झाला असून त्याने प्रसिद्धीस दिलेल्या एका चित्रफितीत या आरोपीने आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी यांचे नाव घेऊन थेट आरोप केला होता.त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर ही आज सायंकाळी 4.30 वाजता महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव,कर्मवीर काळे कारखांच्याचे संचालक दिनार कुदळे,नगर परिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,माजी उपनगराध्यक्ष स्वनील निखाडे,फकीर कुरेशी,रमेश गवळी आदीसह बहुंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,शहरात अवैध व्यवसाय आणि पुरवठा विभागातील भ्रष्टाचार यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाली असेल तर त्या बाबत पोलिस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.त्यात आमचे कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांना आम्ही अभय देणार नाही तसा आमचा लौकिक नाही.दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.यातील दोषी चौकशीत समोर येतीलच त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मताचे आम्ही आहोत.दरम्यान काही कार्यक्रमांत काही जण आमचेसोबत फोटो काढून त्याचा दुरुपयोग करत असेल तर आम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.ते सामान्य नागरिक असो की कार्यकर्ते ते व्यक्तिगत जीवनात काय करतात यावर आम्हीच काय कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही.तो त्यांचा वैयक्तिक मामला आहे.म्हणून कोणी भविष्यात गुन्हा करणार किंवा नाही याचे अचूक भविष्य आम्हाला माहिती असू शकत नाही.त्यामुळे विरोधकांनी विनाकारण राईचा पर्वत करू नये.उलट आपल्या खाली काय जळते याची खात्री करावी असे आवाहन करून शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळली या बाबत पत्रकारांनी त्यांना घेरले असता त्याबाबत आपण बैठक घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देऊ.मात्र शहर आणि तालुक्यात झालेला विकास काही जणांना पाहवत नसल्याने व आगामी काळात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन ही मंडळी आपल्या लौकिकाप्रमाणे नको ते विषय घेऊन नागरिकांचे विकासावरील लक्ष इतर गोष्टीकडे वळवू इच्छित आहेत.त्याला सामान्य जनता बळी पडणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे.
सदर त्यांनी आपल्या काळात शहरास पाणी पुरवठा करणारा पाच क्रमांकाचा तलाव पूर्ण करून व त्याचे जलपूजन करून जनतेला रविवार पासुन तीन दिवसाआड पाणी देण्याचे निर्णय घेतला आहे.ते पाणी आगामी काळात दिवसाआड देता येईल असा त्यांनी दावा केला आहे.एवढेच नाही तर आपली पाच वर्षाच्या काळात आपण शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या इमारती,त्याचे निवासस्थान इमारत,न्यायालयीन इमारत,ग्रामीण रुग्णालय इमारत व विस्तारीकरण,तीर्थक्षेत्र विकास निधी,शहर आणि रस्ते आदी साठी तीन हजार कोटीहून अधिक निधी आणला आहे.शहराला आपण निव्वळ शहरासाठी 350 कोटींची विकास कामे केली आहे तर आगामी काळात 323 कोटींची भूमिगत गटार प्रस्तावित केली असून त्याला प्रशासकीय मान्यता दिली एकूण 700 कोटी रुपये विकासासाठी निधी आणला आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीने त्यांना झगडे फाटा ते वडगाव पान या निकृष्ट रस्त्याचा विषय छेडला असता त्या ठेकेदारास आपण पुन्हा रस्ता करायला सांगितला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.काही पत्रकारांनी शहरातील विविध निकृष्ट रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला असता ज्याच्यावर जी जबाबदारी दिली ती व्यवस्थित पार पडली नसेल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी अपक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा आणला तो चुकीचा होता.एका गुंडाने आरोप केला त्याच्या विश्वासार्हतेवर त्यांनी विश्वास ठेवला हे हास्यास्पद असल्याचा दावा करून त्यांनी आणलेले अनेक कार्यकर्ते दोन नंबरचे व्यवसाय करत असल्याचा गंभीर दावा केला असून त्यांच्या सोबतीने आणलेला मोर्चा किती विश्वासार्ह मानायचा असा सवाल उपस्थित केला आहे.