जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
   कोपरगाव शहरातील भाजीपाला मार्केट जवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मोकळ्या जागेत मोठी दुर्गंधी पसरली असून त्याकडे कोपरगाव नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून सदर दुर्गंधी त्वरित दूर करण्याची मागणी केली आहे.

“कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,कोपरगाव तहसील कार्यालय,विघ्नहर्ता चौक,इंदिरा पथ आदी ठिकाणी मोकाट जनावरे,कुत्री वाढली असल्याने अपघात वाढले आहे.अनेकांची जीवित व वित्तीय हानी वाढली आहे.त्यावर नगरपरिषद काय कारवाई करणार ? नागरिकांना प्रत्येक वेळी आंदोलन करावे  लागेल काय”- उमाकांत धुमाळ,ज्येष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.

   कोपरगाव नगर परिषदेच्या नगरसेवकांचा कालावधी संपून जवळपास तीन वर्षे होत आली आहे.मात्र अद्याप राज्य सरकारला निवडणुका घेण्यास वेळ मिळत नाही.लोकसभा निवडणुका होऊन जवळपास चार महिन्यांचा कालखंड उलटला आहे.मात्र केंद्र सरकारला जनतेने व शेतकऱ्यांनी तडाखा दिल्याने त्यातून सरकार सावरण्यास तयार नाही.त्यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आदित स्वतःला गुंतवून घेतले आहे.त्यामुळे विविध पाहणी अहवालानी राज्य सरकारची झोप उडवली असल्याने सरकार निवडणुका घेण्यास कचरत आहे.परिणामी राज्यातील नगर परिषदात प्रशासन राज आले आहे.त्यामुळे सदर प्रशासन कोणालाही जुमानेसे झाले आहे.

या  मुदत संपलेल्या नगर परिषदांत भ्रष्टाचाराचे नवनवे उच्चांक होत असल्याचे दिसून येत आहे.विविध रस्ते कामे व अन्य विकास कामे निकृष्ट होताना दिसत आहे.अधिकारी यांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे नागरिकांच्या हालास पारावर राहिला नाही.शहरात मोकाट जनावरे वाढल्याने रस्ते अपघात वाढले आहे.डासांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.शहरात अनेक महिन्यांपासून सूर्यदर्शन होत नसताना फवारणी करण्यास आरोग्य विभागाला वेळ मिळत नाही.याला कोपरगाव नगरपरिषद अपवाद नाही.
दरम्यान कोपरगाव नगरपरिषद हद्दीत भाजीपाला मार्केट जवळ व डॉ.उंबरकर यांचे हॉस्पिटल मागे अनावश्यक पदार्थ आणून टाकले जात आहे.चंबडी बाजारातील अनावश्यक घान टाकली जात आहे.हॉटेल चालक मुदत संपलेले अन्न टाकून त्यास भर घालताना दिसत असल्याने त्याची मोठी दुर्गंधी वाढली आहे.परिणामी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आपले नाक झाकून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे हॉस्पिटल आणि जवळचे नागरिक यांना जगणे मुश्किल झाले आहे.याबाबत संबंधित नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच उपयोग होताना दिसत नाही अशा त्यांच्या तक्रारी आहेत.त्यामुळे जवळच्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे आता नगरपरिषद काय भूमिका घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

“कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,कोपरगाव तहसील कार्यालय,विघ्नहर्ता चौक,इंदिरा पथ आदी ठिकाणी मोकाट जनावरे,कुत्री वाढली असल्याने अपघात वाढले आहे.अनेकांची जीवित व वित्तीय हानी वाढली आहे.त्यावर नगरपरिषद काय कारवाई करणार ? नागरिकांना प्रत्येक वेळी आंदोलन करावे  लागेल काय असा सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते उमाकांत धुमाळ यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close