जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

गोदावरीस महापूर तरी…या शहरातील नागरिकांना ८ दिवसाआड पाणी !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   वर्तमानात कोकणात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीला पुर आला असला तरी कोपरगाव शहरात पिण्याचे पाणी आठ दिवसाआड सुरू असल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी टीका केली असून नागरिकांना चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी पालिकेकडे केली आहे.

  

“वर्तमानात गोदावरी नदीला पावसाळ्यातला दुसरा पूर आला असून गोदावरी कालवा दुथडी भरून वाहत असताना नगरपालिका जनतेला ४ दिवसाआड पाणीपुरवठा करून पालिका अधिकारी व प्रशासन जनतेला का वेठीस धरत आहे.जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत चार दिवसाआड का करत नाही ?- मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.  

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चार साठवण तलाव शहराची तहान भागविण्यासाठी असमर्थ ठरत होते.त्यामुळे मागील अनेक वर्षापासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.याची दखल घेवून आ.आशुतोष काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पाणी प्रश्न सोडविण्याची विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १३१.२४ कोटीच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळवली होती.त्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.मात्र दोन वर्षाचा कालावधीत हे काम पूर्ण झालेले नाही ते अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सत्ताधारी गटाने दिली आहे.परिणामी आजही शहरास पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यास आपले पाण्यावर चालणारी दुकानदारी संपुष्टात येण्याच्या भितीपोटी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत माजी आ.कोल्हे गटाने उच्च न्यायालयात याचिकावर याचिका दाखल केल्या होत्या.त्या याचिकेवर सुनावणी होवून औरंगाबाद खंडपीठाने या याचिका वारंवार फेटाळल्या होत्या.तरीही नाव बदलून त्यांनी तोच तो खेळ पुन्हा सुरू ठेवला आहे.वर्तमानात तो सुरू असल्याने सदर  तलावाचे काम प्रलंबित होत असल्याची  माहिती आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे.वर्तमानात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.मात्र कोपरगाव शहरातील नागरिकांना वहाडणे घाटावर जावून पाहण्यापलिकडे हाती काही नाही.या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी हा खडा विद्यमान राजकीय वर्तुळात फेकला आहे.त्यामुळे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवायची की कोपरगाव नगर परिषद याबाबत शहरात आणि तालुक्यात  उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   दरम्यान त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की,”नगरपालिकेच्या शुध्दीकरण प्रकल्पाचे पाणी औद्योगिक वसाहती स एका जलवाहिनी द्वारे पुरवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परिणामी शहराला पाणी पुरवणारी पाण्याची टाकी भरत नाही असा आरोप करून किती तास वेळेवर पाणी न सोडता महिलांना तिष्ठत ठेवणार असा सवाल विचारला आहे.पाणी सोडण्यात वेळेचा बदल होत असल्यास त्या भागातील ‘वॉलमन’ने फिरून तेथील नागरिकांना पाण्याची वेळ कळवली पाहिजे.मात्र तसे होताना दिसत नाही असा आरोप केला आहे.उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नाही हे कारण सांगून  १३ ते १४  दिवसाआड पाणीपुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने केला आहे व आगामी काळात त्याची पुनरावृत्ती होणार असण्याची चिन्हे आहे.मात्र वर्तमानात गोदावरी नदीला पावसाळ्यातला दुसरा पूर आला असून गोदावरी कालवा दुथडी भरून वाहत आहे तरीसुद्धा नगरपालिका जनतेला ४ दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत करून का देत नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.पालिका अधिकारी व प्रशासन जनतेला का वेठीस धरत आहे.जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत चार दिवसाआड का करत नाही ? असा रास्त सवाल त्यांनी विचारला आहे.पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ज्यामुळे शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊन हाल होत आहे.एकीकडे पालिका हद्दीत पाणी साठवून ठेवण्यासाठी झोपडपट्टी भागात लोक उपलब्ध भांड्यामध्ये पाणी साचवतात आणि दुसरीकडे नगरपालिका सांगते की,”पाणी साठवून ठेवू नका,डेंग्यूचे डास तयार होतात” त्यामुळे हा विरोधाभास कधी कमी करणार आहे.दुसऱ्या बाजूला नगरपालिका पाण्याचे दिवस कमी करायचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही असे विरोधाभासी चित्र तयार झालेले पहायला मिळत आहे.त्यातच ढगाळ हवामानामुळे शहरात डासांचा त्रास वाढला आहे.त्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप केला आहे.नगरपालिकेला पूर्ण पाणीपट्टी भरून देखील सुद्धा नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी पिण्यासाठी नगरपालिका का देत नाही याचा खुलासा नगरपालिकेने केला पाहिजे व कालवा चालू असे पर्यंत नगरपालिकेने ४ दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close