जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

लोक कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या -…यांचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी)

महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे.या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील समाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात दिले आहे.

 

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ झाला असून या योजनेमध्ये बांधकाम कामगार,घरेलू कामगार,माथाडी कामगार,सुरक्षारक्षक इत्यादी यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३००० रुपये आश्वासित पेन्शन मिळणार आहे.

कोपरगाव येथील कृष्णाई बॅक्वेट हॉल येथे आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट असंघटित कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदार संघातील इमारत बांधकाम कामगारांसाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर,तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण,तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच व बांधकाम साहित्याचे कीटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.


सदर प्रसंगी यावेळी सम्राट असंघटित कामगार संघटनेचे सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या प्रसंगी ते पुढे बोलताना म्हणाले की,”महायुती शासन राज्यातील सर्वच घटकांचा विचार करणारे शासन आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील तमाम माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या काही अंशी स्वावलंबी करणारी आहे.तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी व बांधकाम साहित्य कीट,विश्वकर्मा कारागीर योजना,युवा कौशल्य प्रशिक्षण विद्या वेतन योजना,वृद्धांसाठी मोफत तीर्थक्षेत्र योजना शेतकऱ्यांना मोफत वीज अशा विविध योजना महायुती शासन राबवीत आहे.या योजनांचा समाजातील पात्र गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे आपली सामाजिक बांधिलकी आहे. या जाणीवेतून माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोपरगाव शहरासह गावागावात सहाय्यता केंद्र सुरु केल्यामुळे माता भगिनींच्या अडचणी कमी झाल्या. त्याप्रमाणेच सर्वच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी व बांधकाम साहित्याचे कीट मिळावे यासाठी ज्या कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी नाही अशा मतदार संघातील कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली आहे.त्यामुळे अशा कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.सदर प्रसंगी त्यांच्या हस्ते एकून २३६ बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच व सुरक्षा कीट देण्यात आले व शासनाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close