जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

  …’त्या’आरोपाशी आपला संबंध नाही-पोलीस अधिकारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात काल तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकित शहर पोलीस ठाण्याच्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी केलेल्या आरोपाचे संबंधित अधिकाऱ्याने खंडन केले असून याबाबत आपण घटनास्थळी तत्काळ पोहचलो होतो.सदर आरोप हा वैयक्तिक आकसातून करण्यात आला असून त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही असा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने केला आहे.त्यामुळे शहरात कोण खरे कोण खोटे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  

”आपण या प्रकरणी खबर मिळल्याबरोबर घटनास्थळी हजर झालो होतो व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता अशी माहिती दिली आहे.त्या पुष्ट्यर्थ त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्यातील संवादाची भ्रमणध्वनी वरील ध्वनीफितही आमच्या प्रतिनिधीस ऐकवली आहे व त्यांनी या प्रकरणी वैयक्तिक आकसातून ही घटना घडुन आणली आहे”-कनिष्ठ पोलीस अधिकारी,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर व लोकसभेत शपथ घेतल्यानंतर कोपरगाव तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल दुपारी ४.३० वाजता शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी मान्यवर पदाधिकारी व प्रशासन अधिकारी आदींची एक आढावा बैठक आयोजित केली होती.त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख कैलास जाधव,शहर प्रमुख सनी वाघ,संदीप वर्पे आदींनी कोपरगाव शहरात वाढलेली गुन्हेगारी व मटका,सोरट,मुक्त हस्ते मिळणारी अवैध दारू आदी अवैध व्यवसायावर हल्ला बोल केला करताना शहरात १८० मटका केंद्रे असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सांगून त्यात सुभाषनगर,हनुमाननगर,गांधीनगर,टिळकनगर आदींचा समावेश असून लहान मुले, ‘कुत्ता’ या नवीन व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता.व त्यावेळी शहरात विविध ठिकाणी तरुण टोळक्याने गोळा होत असून त्यातून मोठी गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करून शहरातील शांतता भंग होण्याची भीती वाढली असून त्यातून पोलिसांनी शहरात गस्त वाढविण्याची मागणी केली होती.आम्ही तक्रारी केल्या तर आमच्यावर सरकारी कामात अडथळे आणण्यासारखे भा.द.वि.३५३ सारखे गुन्हे दाखल होण्याची भीती व्यक्त केली होती.

  दरम्यान या प्रसंगी कैलास जाधव यांनी,’खंदकनाला’ या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती देताना,”काही तरुणांची हाणामारी सुरू असताना त्यातून अनास्था प्रसंग घडण्याची शक्यता असल्याने आपण,”एक कनिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेऊन”अधिकाऱ्यास  दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी,”एखादा मरू द्या मग कारवाई करू असे उद्दाम उत्तर दिले” असल्याचा जाहीर बैठकीत आरोप केला होता.त्याची दखल खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतली होती व उपस्थित पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांना या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या.

   दरम्यान या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने संबंधित कनिष्ठ अधिकारी यांचेशी आज संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी स्पष्ट शब्दात इन्कार केला असून आपण या प्रकरणी खबर मिळाल्याबरोबर घटनास्थळी हजर झालो होतो व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता अशी माहिती दिली आहे.त्या पुष्ट्यर्थ त्यांनी आरोप कर्ता आणि त्यांच्यातील भ्रमणध्वनीवरील ध्वनीफितही आमच्या प्रतिनिधीस ऐकवली आहे व त्यांनी या प्रकरणी वैयक्तिक आकसातून ही घटना घडुन आणली असल्याचे म्हटले आहे.आपण कायम कोपरगाव शहरात शांतता अबाधित राहील यासाठी प्रयत्नशील असून या पुढेही राहु ते आपले कर्तव्य असल्याचे सांगून पुढे बोलताना त्यांनी मात्र पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून वैयक्तिक चारित्र्यहनन करू नये” असे आवाहन केले आहे.त्यामुळे याबाबत सदरचा आरोप का केला असा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत शहरात उलतसुलट चर्चेला उधाण आले आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close