जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहतील कायदा सुव्यवस्था धोक्यात,जनतेचा सूर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   सामान्य जनतेची कामे करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा व त्यांना न्याय देण्याची भुमीका घ्यावी असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोपरगाव येथील आढावा बैठकीत केले आहे.

दरम्यान या प्रसंगी कैलास जाधव यांनी खंदकनाला या ठिकाणी काही तरुणांची हाणामारी सुरू असताना आपण एक कनिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेऊन दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी,”एखादा मरू द्या मग कारवाई करू असे उद्दाम उत्तर दिले” असल्याची माहिती उपस्थितांना दिली असल्याचे अनेकांना अवाक होण्याची वेळ आली आहे अशा वेळी कायदा सुव्यवस्था कशी राहू शकते असा तिखट सवाल केला आहे.


   लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर व लोकसभेत शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी कोपरगाव तहसीलदार कार्यालयात जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

  

  सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते,रोहित वाकचौरे,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,माजी नगराध्यक्ष अनिल जाधव,माजी नगरसेवक अतुल काले,वर्षा शिंगाडे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,ग्राहक सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर,शहराध्यक्ष सनी वाघ,इरफान शेख,रंजन जाधव,पप्पू पडियार,विशाल झावरे,किरण खर्डे,कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,जिल्हा परिषदेचे तालुका कृषी अधिकारी पंडित वाघेरे,कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,महावितरण कंपनीचे अधिकारी,महसूल अधिकारी,विविध विभागाचे अधिकारी यांचेसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सामान्य जनता हाच आपल्या प्रशासनाचा समाधानाचा बिंदू असायला हवा व त्यासाठी आपण झोकून द्यायला हवे तरच आपल्याला समाधान मिळू शकत असल्याचे त्यांनी शेवटी सांगून अधिकाऱ्यांना विभागनिहाय बैठक लावणार असल्याची माहिती दिली असून त्याचा आढावा देण्याचे फर्मान काढले आहे.

कोपरगाव शहरातील मुद्रांक विक्रेता जनतेकडून १०० रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांस विकत असून सेतू चालक जनतेला लुटत असल्याचा आरोप करून पप्पू पडियार यांनी चुकांची दुरुस्ती करा सेतू केंद्राच्या दर्शनी भागात दरपत्रक प्रसिद्धी करा अन्यथा आगामी काळात आमचे सरकार येणार असून त्यावेळी पाहून घेऊचा दम भरला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

   सदर प्रसंगी संदीप वर्पे व कैलास जाधव यांनी कोपरगाव शहरात वाढलेली गुन्हेगारी व मटका,सोरट,मुक्त हस्ते मिळणारी अवैध दारू आदी अवैध व्यवसायावर हल्ला बोल केला असून शहरात १८० मटका केंद्रे असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सांगून त्यात सुभाषनगर,हनुमाननगर,गांधीनगर,टिळकनगर आदींचा समावेश असून लहान मुले कुत्ता या नवीन व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप केला असून शहरात विविध ठिकाणी तरुण टोळक्याने गोळा होत असून त्यातून मोठी गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करून शहरातील शांतता भंग होण्याची भीती वाढली असून त्यातून पोलिसांनी शहरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.आम्ही तक्रारी केल्या तर आमच्यावर सरकारी कामात अडथळे आणण्यासारखे भा.द.वि.३५३ सारखे गुन्हे दाखल होण्याची भीती व्यक्त केली आहे.

  दरम्यान या प्रसंगी कैलास जाधव यांनी खंदकनाला या ठिकाणी काही तरुणांची हाणामारी सुरू असताना आपण एक कनिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेऊन दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी,”एखादा मरू द्या मग कारवाई करू असे उद्दाम उत्तर दिले” असल्याची माहिती उपस्थितांना दिली असल्याचे अनेकांना अवाक होण्याची वेळ आली आहे अशा वेळी कायदा सुव्यवस्था कशी राहू शकते असा तिखट सवाल केला आहे.त्यावेळी अनेकांना कपाळास हात लावण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विद्युत रोहित्राचे मोठया प्रमाणावर पैसे मागणे,याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले असून यात अधिकाऱ्यांची बोबडी वळली असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान बैठक सुरू असतानाच वीज गेल्याने त्याचा अनुभव खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनाच सप्रमाण आला असल्याचे दिसून आले आहे.त्यावर उपस्थितांत मोठा हशा पिकला होता.

   दरम्यान त्यांच्या सुरात सूर शहराध्यक्ष सनी वाघ यांनी मिळवला असून त्यांनी अवैध व्यवसायावर हल्ला बोल केला आहे.व शहरातील शांतता भंग होण्याची भीती व्यक्त केली असून याची दखल खा.वाकचौरे यांना घेण्याची विनंती केली असून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याकडे लक्ष वेधून घेतले असून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.त्यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी या प्रश्नी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान या प्रसंगी शहर आणि तालुक्यातील सेतू चालक सामान्य जनतेची लूट करत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे.या शिवाय मुद्रांक विक्रेता जनतेकडून १०० रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांस विकत असून जनतेला लुटत असल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी पप्पू पडियार यांनी चुकांची दुरुस्ती करा सेतू केंद्राच्या दर्शनी भागात दरपत्रक प्रसिद्धी करा अन्यथा आगामी काळात आमचे सरकार येणार असून महसूल विभागास अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.त्यामुळे उपस्थितांत याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

   सदर प्रसंगी महावितरण कंपनीच्या लहरीपणाच्या बाबतीत किरण खर्डे व अन्य कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या असून यातील वीज मध्येच गायब होणे,शेतकऱ्यांकडून विद्युत रोहित्राचे मोठया प्रमाणावर पैसे मागणे,याबाबत अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले असून यात अधिकाऱ्यांची बोबडी वळली असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान बैठक सुरू असतानाच वीज गेल्याने त्याचा अनुभव खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनाच सप्रमाण आला असल्याचे दिसून आले आहे.त्यावर उपस्थितांत मोठा हशा पिकला होता.त्यावेळी जुण्या व कालबाह्य वीज वाहक तारा व विद्युत पोल बदलून देण्यासाठी खा.वाकचौरे यांनी वीज कंपनीचे मुख्य अभियंता यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व कोपरंगाव तालुक्यातील विजेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.  

   दरम्यान अतिवृष्टीचा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला असता तहसीलदार भोसले यांनी सन-२०२२-२३ मधील ४ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली असून ६०० शेतकरी बाकी असल्याची कबुली दिली आहे.व लवकरच ती त्याच्या खाती जमा होतील अशी माहिती दिली आहे.

  दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आपण केंद्रातून ४२ कोटी रुपयांचा निधी आणला असताना  हा पाणी प्रश्न का मार्गी लागला नाही असा खोचक सवाल खा.वाकचौरे यांनी केला आहे.व कोपरगाव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहे.शहरातील व तालुक्यातील घरकुले व अन्य प्रश्नासाठी त्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

  यावेळी काही अतुल काले,संजय सातभाई आदी कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधून घेतले होते.तर जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याच्या दुरावस्थेकडे,त्यावेळी त्यांनी हा रस्ता आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान यावेळी काही कार्यकर्त्यांनी तालुक्यात तालुस्तरावर महत्वाचे अधिकारी अद्याप नाही लक्ष वेधून घेतले,ग्रामसेवक अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या असल्याचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावेळी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी त्या लवकरच होतील असे आश्वासन दिले आहे.   
   यावरील काही शेतकऱ्यांनी तालुक्यातील खरीप पिकांचे विमे व त्यांची काय स्थिती आहे याबाबत लक्षवेधी केला त्यास खा.वाकचौरे यांनी सहमती दर्शवली होती.व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता.त्यावर तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी सोयाबीन,मका,कपाशी,तूर,बाजरी,भुईमूग,कांदा आदी पिकांना एक रुपयांत पीक विमा संरक्षण दिले जात असल्याची माहिती दिली आहे.
  सदर प्रसंगी प्रास्ताविक तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close