जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या कामांची आमदारांनी केली पाहणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय व बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बस स्थानक परिसरात सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम प्रगतीपथावर असून आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच या कामांची पाहणी करून सबंधित अधिकारी व ठेकेदार यांना गुणवत्तापूर्ण काम करून वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

      

“कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवून २८.८४ कोटी निधी मंजूर मिळविला आहे.तसेच कोपरगाव बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जाऊन बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

        कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी २९०० कोटी रुपयांचा निधी मिळवून मतदार संघातील अनेक प्रलंबित असेलेले रस्ते,पाणी,आरोग्य असे मुलभूत प्रश्न मार्गी लावले असून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न व बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक असलेले व्यापारी संकुलाचा प्रश्न त्यांनी मार्गी लागला असल्याचा दावा केला आहे.
   यामध्ये कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवून २८.८४ कोटी निधी मंजूर मिळविला आहे.तसेच कोपरगाव बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जाऊन बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यापारी संकुलाला मंजुरी मिळवून १४ कोटी रुपये निधी आ.काळे यांनी आणला आहे.

            मतदार संघातील इतर विकास कामांबरोबर कोपरगाव शहरातील २८.८४ कोटी निधीतून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे व १४ कोटी निधीतून बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाची देखील पाहणी केली.हि कामे मुदतीच्या आत पूर्ण होतील व गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही तडजोड होणार नाही याची काळजी घेवून नियोजित आराखड्यानुसार लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना आ.काळे यांनी सबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक,कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close