जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

मुस्लीम कब्रस्थान विकासासाठी २.२५ कोटी निधी-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    मुस्लीम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल भाग व मुस्लीम कब्रस्थानच्या विविध १८ विकास कामांसाठी २.२५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

    मतदार संघातील अनेक मुस्लीम कब्रस्थानची दुरावस्था झाल्यामुळे व अल्पसंख्यांक बहुल भागात विविध विकास कामे रखडल्यामुळे या कामांसाठी निधी देवून या समस्या सोडवाव्यात अशी मागणी मतदार संघातील मुस्लीम बांधवांनी आ.काळे यांच्याकडे केली होती.त्या मागणीची दखल घेवून त्यांनी केलेल्या केलेल्या पाठपुराव्यातून अल्पसंख्यांक बहुल भाग व मुस्लीम कब्रस्थानच्या विविध विकास कामांसाठी २.२५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.


   या निधीतून मुर्शतपूर मुस्लीम कब्रस्थान संरक्षक भिंत व गेट बांधणे (१० लक्ष),शिरसगाव मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे खाकी पीर बाबा दर्गा पेव्हर ब्लॉक बसविणे (१०लक्ष), सोयेगाव मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे व संरक्षक भिंत बांधणे (२०लक्ष),वारी येथील मुस्लीम कब्रस्थान पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरण करणे (२०लक्ष),घारी मुस्लीम कब्रस्थान वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१५लक्ष),मढी बु. मुस्लीम कब्रस्थान वॉल कंपाऊंड करणे (१०लक्ष),ब्राम्हणगाव मुस्लीम कब्रस्थान शेड बांधणे व वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१० लक्ष),भोजडे मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे व हायमास्ट बसविणे (१०लक्ष), चांदेकसारे मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे (२०लक्ष), कोळपेवाडी मुस्लीम वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे (१०लक्ष), धामोरी कब्रस्थान वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१५ लक्ष),कोकमठाण मुस्लीम कब्रस्थान वॉल कंपाऊंड करणे व मस्जिद जवळच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (१५ लक्ष), सुरेगाव मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे (१०लक्ष),करंजी मुस्लीम कब्रस्थान सुशोभिकरण करणे (१०लक्ष),चितळी मुस्लीम कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे (१०लक्ष), जळगाव मासूमबाब दर्गा मस्जिद परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व संरक्षक भिंत बांधणे (१०लक्ष), वाकडी येथे अल्ताफ तांबोळी घर ते आलम तांबोळी घर रस्ता खडीकरण करणे(१०लक्ष),धोत्रे शेख वस्तीजवळ खडीकरण करणे (१०लक्ष) या कामांचा समावेश आहे.

  मुस्लीम समाजाच्या मागणीची दखल घेवून विकास कामांना निधी दिल्यामुळे मतदार संघातील मुस्लीम समाजाने आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.या कामाच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close