कोपरगाव शहर वृत्त
…या शहरातील मिळकती नियमानुकूल करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नंबर २१५ वरील मिळकती नियमानुकूल करून वास्तव्यास असणाऱ्या ६५० कुटुंबांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नुकतीच केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.२१५ मध्ये नागरिकांच्या मिळकती असून त्यामध्ये जवळपास ६५० कुटुंब वास्तव्य करीत आहे.या मिळकती नियमानुकूल व्हाव्यात अशी या कुटुंबांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी आहे.त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून सर्व्हे नं.२१५ मधील सर्व मिळकती नियमानुकूल करणेसाठी आ.काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेवून मागणी केली आहे.
या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा,वाल्मिक लहिरे, सचिन गवारे,सलिम चमडीवाले,बाबुभाई सय्यद,रशीद शेख,युसुफ पठाण,आसिफ मणियार,मुनीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.