कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात भगव्या रंगात रंगला प्राण प्रतिष्ठा सोहळा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून कोपरगाव शहरात विविध संघटनांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिर स्थापना दिनी विविध कार्यक्रमाचे मोठया उत्साहात आयोजन केल्याचे दिसून आले आहे.या राम भक्तीत शहर भगव्या रंगात रंगून गेले असल्याचे दिसून आले आहे.सोहळ्याच्या पूर्व संध्येला कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या भव्य भगवा श्रीराम दुचाकी फेरीत आ.आशुतोष काळे यांनी सहभाग नोंदवला असून राम भक्तांना प्रोत्साहित केले असल्याचे दिसून आले आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आज नुकताच पार पडला.या सोहळ्यामुळे केवळ भारतातच नाही,तर जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.विशेषत: जगभरातील अनेक रामभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद,उत्साह दिसून येत आहे.कोपरगावसह अमेरिका,ऑस्ट्रेलिया,मॉरिशस,नेपाळसह जगभरातील अनेक देशांमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे.कोपरगाव शहरात अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती,समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य भगवा मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम भक्तांचे मागील पाच शतकापासूनचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असतांना या अभूतपूर्व सोहळ्याचा अनमोल क्षण साजरा करण्यासाठी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने काढण्यात आलेल्या भव्य भगवा श्रीराम फेरीत सहभागी होवून जय श्रीरामच्या घोषणा देवून संपूर्ण परिसर दुमदुमला होता.डोक्याला भगवे फेटा परिधान करून गळ्यात भगवे उपरणे घेतलेल्या श्रीराम भक्तांनी भगवे झेंडे फडकावत श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कोपरगाव शहरातील चौका-चौकात पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत या भगवा श्रीराम फेरीचे स्वागत करण्यात आले.
संपूर्ण देश रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज असून हा आनंदोत्सव साजरा करतांना कोपरगाव शहरात घरोघरी सडा- रांगोळी काढण्यात आल्याचे दिसून आले असून काही विशिष्ट घरांचा अपवाद वगळता घराघरावर भगवा ध्वज फडकविण्यात आला असल्याचे दिसून आले आहे.शिर्डीसह जनार्दन स्वामी मंदिर कोपरगाव.शुक्राचार्य मंदिर,आत्मा मालिक मंदिर,आदी प्रमुख मंदिरांसह तालुक्यातील विविध गावात प्रभू श्रीरामच्या प्रतिमांची मिरवणूक संपन्न झाली आहे.गावातील मंदिरे स्वच्छ करण्यात आले आहे.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई दिसून आली आहे.यात विशेषतः तरुणांनी उत्साह दाखवला आहे.तर भजनी मंडळांनी आपली सेवा प्रभू राम चरणी अर्पण केली आहे.विविध सहकारी संस्था आणि त्यांच्या संचालक मंडळांनी सहभाग नोंदवून आपली सेवा अर्पण केली आहे.
गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनने सर्व गल्लीत भगव्या पताका आणि भगवे झेंड्यानी सर्व परिसर भगवामाय करून टाकला असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान प्राण प्रतिष्ठथेच्या वेळी प्रभू रामचंद्रांची आरती म्हटली असून त्यात परिसरातील सर्व भाविकांनी हजेरी लावली आहे.
तर कोपरगाव शहर शिवसेना यांनी बस स्थानकासमोर प्रभू रामचंद्राची व मंदिरांची मोठी प्रतिमा उभी करून त्यास वंदन केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तेच दृश्य दिसून आले आहे.शहरतील अन्य ठिकाणीही हीच पुनरावृत्ती दिसून आली आहे.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे समोरची राम भक्तीची धून ऐकू येत होती.तर निवारा परिसरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमांच्या कमानी व घरोघरी भगवे ध्वज माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी लावलेले आढळून आले आहेत.या शिवाय साईसीटी,शिंदे-शिंगीनगर,छत्रपती संभाजी चौक,विवेकानंद नगर,साईनगर,सुभाषनगर,टिळकनगर,शिवाजी रोड,गांधीनगर व ग्रामीण कोपरगाव तालुक्यात हेच दृश्य दिसून आले आहे.
कोपरगाव शहरात हा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव अत्यंत शिगेला पोहोचला असल्याचे यावेळी दिसून आले.