कोपरगाव शहर वृत्त
विकासाबाबत एकही समाज मागे ठेवला नाही-…या नेत्याचा दावा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मतदार संघातील जनतेने दिलेल्या जनसेवेच्या संधीतून विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा कायापालट करतांना मागील चार वर्षात सर्व समाजाला समान न्याय देवून समाजाभिमुख विकास करतांना एकही समाज मागे ठेवला नसल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव शहरतील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
कोपरगाव येथे आ.काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर १० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या ‘सासवड माळीसभा बोर्डिंगच्या’ नूतनीकरण कामाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,रवींद्र बोरावके,रामभाऊ बनकर,कैलास माळी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,गौतम टिळेकर,राजेंद्र बोरावके,अमोल गिरमे,आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे,शहराध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा,माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,संदीप कपिले,वाल्मिक लहिरे,गणेश बोरुडे,सचिन गवारे,शुभम लासुरे,हर्षल जैस्वाल,रोहन कांबळे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”आपल्याला जनसेवेची संधी देण्यात मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या समाज बांधवांचा सहभाग आहे.त्यामुळे विकासाभीमुख दृष्टीकोनातून कोपरगावचा चेहरा मोहरा बदलवत असतांना मतदार संघातील रस्ते,वीज,पाणी प्रश्न आदी कामांबरोबरच विविध समाजाकरीता निधी देऊन कुठलाही समाज विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही याची आजवर दक्षता घेत आलो असून यापुढे देखील घेत राहणार आहे.माजी खा.शंकरराव काळे यांनी देखील माळी बोर्डींग साठी भरीव मदत केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा वारसा पुढे चालवतांना आपण देखील प्रत्येक समाजाला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून प्रत्येक समाजाच्या विकासासाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी या वेळी शेवटी बोलताना सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक कैलास माळी यांनी केले आहे तर सूत्रसंचालन राजेंद्र बोरावके यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन पद्मकांत कुदळे,रवींद्र बोरावके यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार विरेन बोरावके यांनी मानले आहे.