कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात मंत्र्यांनी केला मंदिर सफाईस प्रारंभ !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सोमवार दि.२२ रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिवसेंदिवस शिगेला पोहोचला असून या दिवशी आपापल्या परिसरातील मंदिरांची साफ सफाई करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी कोपरगाव शहरातील मंदिरात साफ सफाई केली आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नाशिकच्या काळाराम मंदीराला भेट देऊन,मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली होती.यावेळी अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.यानंतर १४ जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरात महास्वच्छता मोहीम राबविण्याचे सूचित केले होते.त्यानुसार आता १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मंदिरआणि तिर्थक्षेत्रांत ही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.या पार्श्वभूमीवर आज रामभक्तांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे,आ.आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे आदींनी आज या कोपरगावातून या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,चेतन खुबाणी,विकास आढाव,भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,अंबिका तरुण मंडळ सदस्य व असंख्य राम व हनुमान भक्त उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव शहरात आ.काळे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरातील वातावरण श्रीराममय करून टाकल्याबद्दल आ.काळे यांचे कौतुक केले.पाचशे वर्षानंतर आलेला हा ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा नागरिकांनी दिवाळी सारखा मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन शेवटी केले आहे.
त्यानंतर ‘गुरुद्वारा’ येथे जाऊन पूजन करण्यात आले.यावेळी शीख-पंजाबी बंधूंनी ना.विखे यांचा सन्मान केला.त्यानंतर ना.विखे यांनी हेलिकॉप्टरने संगमनेरकडे प्रयाण केले.
दरम्यान प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त समस्त कोपरगावकरांच्या वतीने रविवार २१ रोजी सायंकाळी ०४ वाजता विघ्नेश्वर चौक येथून भगवी फेरी काढण्यात येणार आहे या फेरीमध्ये बहुसंख्येने कोपरगावकरांनी सहभागी व्हावे.तसेच सोमवार दि.२२ रोजी सायंकाळी ०६ वाजता गोदावरी मातेची महाआरती करण्यात येणार आहे.त्यानंतर लेझर शो,भजन संध्या,फायर शो तसेच रॉक बँड म्युझिकल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-आ.आशुतोष काळे