जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात ‘अक्षदा कलशाचे’ जल्लोषात स्वागत

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी मंदिरात साधूसंतांच्‍या उपस्‍थितीत मंत्रघोषाच्‍या साक्षीने मंत्रित झालेल्‍या ‘अक्षदा कलशाचे’ गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी कोपरगाव शहरात आगमन होताच आ.आशुतोष काळे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी जोरदार स्वागत केले आहे.

  

अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे.यानिमित्त संपूर्ण देशभरात लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे.त्या अंतर्गत नगर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान शेकडो गावातील दहा लाख घरी अक्षता देऊन लोकार्पणाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे.यानिमित्त संपूर्ण देशभरात लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे.त्या अंतर्गत नगर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान शेकडो गावातील दहा लाख घरी अक्षता देऊन लोकार्पणाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली असून त्या अंतर्गत कोपरगावात सदर अक्षदा कलश आला असून त्याचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत केले आहे.

दरम्यान श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण देशात अभिमंत्रित केलेला ‘अक्षदा कलश’ पाठविण्यात आला असून या ‘अक्षदा कलशाचे’ कोपरगाव शहरात आगमन होताच आ.काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाचा जयघोष करत ‘अक्षदा कलशाचे’विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.या ‘अक्षदा कलशाचे’ दर्शन घेण्यासाठी कोपरगाव शहरातील चौकाचौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

   यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, रमेश गवळी,मेहमूद सय्यद,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,डॉ.तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर,मुकुंद इंगळे,राजेंद्र खैरनार,एकनाथ गंगूले,राजेंद्र जोशी,मनोज कडू,राजेंद्र आभाळे,विकास बेंद्रे, सोमनाथ शिंदे,नितीन शिंदे,संतोष शेजवळ,विजय नागरे,सेवासींग सहानी,चंद्रकांत धोत्रे,हर्षल जैस्वाल,अमोल आढाव,ठकाजी लासुरे,अर्जुन ठुबे,आकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close