जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा-मालपाणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय,उद्योग करताना सकारात्मक व हसतमुख राहणे गरजेचे असून त्यातून व्यवसाय वृद्धी आपोआप तुमच्या मागे येईल.केवळ लक्ष्मीची पूजा करू नका,तर नारायणाची देखील पूजा करा असे आवाहन उद्योजक संजय मालपाणी यांनी नुकतेच एक कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   

“काम,क्रोध,लोभ हे नरकाचे द्वार असून पराक्रम व पुरुषार्थ,मन व बुद्धी,शरीर व श्वास यात समता आली,तरच व्यापारी व ग्राहकांमध्ये एक घट्ट नातं तयार होऊ शकते.त्यामुळे व्यापाऱ्यांनी सातत्याने स्वतःमध्ये बदल करत राहून आपल्या व्यक्तिमत्वात समता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे”-संजय मालपाणी,उद्योजक,संगमनेर.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्यावतीने बदलत्या व्यापार पद्धतीबाबत तालुक्यातील व्यापारी बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शनपर सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते.

   सदर प्रसंगी गुलशन होडे,महावीर सोनी,संतोष गंगवाल यांनी पदभार स्वीकारला तर बाजार तळ शाखेचे अध्यक्ष आशिष लोढा,कार्याध्यक्ष हर्षल जोशी,उपाध्यक्ष अनिकेत भडकवाडे,सचिव संकेत दरक,शिवाजी रोड व कापड बाजार शाखेचे अध्यक्ष धीरज कराचीवाला,उपाध्यक्ष शाम जंगम,सचिव योगेश पवार,स्टॅन्ड परिसर शाखा अध्यक्ष हर्षल कृष्णाने उपाध्यक्ष हर्षद वाणी सचिव शुभम सोनेकर,धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष प्रणव वाणी,उपाध्यक्ष संदीप काबरा,उपाध्यक्ष निलेश जाधव,सचिव निलेश चुडीवाल,गोदाम गल्ली शाखेचे अध्यक्ष प्रीतेश बंब,उपाध्यक्ष शैलेश ठोळे,खजिनदार देवेश बजाज,सरचिटणीस निरज गोधा,सचिव शाम उपाध्ये,येवला रोड शाखेचे अध्यक्ष आतिष शिंदे,उपाध्यक्ष निकेतन देवकर,उपाध्यक्ष अनुप पटेल,सचिव साईनाथ गोर्डे,मेन रोड व भाजी मार्केट शाखेचे अध्यक्ष नारायण लांडगे,उपाध्यक्ष उल्हास गवारे,उपाध्यक्ष पवन डागा,सचिव मानव शुक्ला,आणि गांधीनगर शाखेचे अध्यक्ष पियुष पापडीवाल,उपाध्यक्ष निलेश काले,सचिव प्रथमेश वाणी आदी उपस्थित होते.

     त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,’काम,क्रोध,लोभ हे नरकाचे द्वार असून पराक्रम व पुरुषार्थ,मन व बुद्धी,शरीर व श्वास यात समता आली,तरच व्यापारी व ग्राहकांमध्ये एक घट्ट नातं तयार होऊ शकते.त्यामुळे व्यापाऱ्यांनी सातत्याने स्वतःमध्ये बदल करत राहून आपल्या व्यक्तिमत्वात समता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.तसेच महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक उपक्रमांपासून खूप शिकण्यासारखे असल्याचे सांगून राज्य पतसंस्था महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले तर उपस्थितांशी विवेक कोल्हे यांनी संवाद साधला आहे.कोपरगाव तालुक्याच्या विकासात व्यापारी महासंघाच्या कामकाजाची सविस्तर माहिती कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब यांनी दिली आहे.

     या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे महासचिव प्रदीप साखरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अजित लोहाडे,उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, कोषाध्यक्ष तुलसीदास खुबानी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष केशव भवर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close