कोपरगाव शहर वृत्त
…आगामी सणात भाविकांची सोय करून द्या-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदूंचा पवित्र नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे.कोपरगाव शहरातील हजारो महिला भाविक कोपरगाव शहर ते मोहनींराजनगर या रस्त्याने जुन्या गंगेतील देवीच्या दर्शनाला या उत्सव काळात पहाटे ते रात्री उशिरापर्यंत जात असतात.दर्शनासाठी जाणाऱ्या या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सदरच्या रस्त्यावरील काट्या काढून रस्ता त्वरित दुरुस्त करून घेणे आवश्यक असल्याची मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे.नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात ( ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो.नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जात असतो.कोपरगाव शहर त्यास अपवाद नाही.कोपरगाव बेट येथील प्राचीन देवी मंदिर येथेही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.वर्तमानात ज्या रस्त्यावरून भाविक येत जात असताना त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे वाढली आहेत.रस्त्यात मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे रात्री व पहाटे जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.त्यासाठी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विद्युत दिवे लावणे गरजेचे आहे.शिवाय रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे आहे.भुयारी मार्गाचे काम तातडीने करणे गरजेचे आहे.मात्र त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसत आहे.त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या बाबतीत लक्ष घालणे गरजेचे आहे.त्यासाठी विजय वहाडणे यांनी या प्रश्नी त्यांचे निवेदन देऊन लक्ष वेधून घेतले आहे.