जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नळ जोडणी विना पाणी पट्टी,…या पालिकेचा भोंगळ कारभार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


कोपरगाव नगरपरिषदेच्या चोवीस तास,बारा तास,आठ तास आदी नळजोडण्या अव्याहत सुरु असताना व पालिकेने त्यावर अद्याप कार्यवाही केली नसताना पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अजब नमुना पुन्हा एकदा समोर आला असून यातील तक्रारदार सुधाकर बाजीराव पवार यांनी नळजोडणी केलेली नसताना त्यांना तब्बल १५ हजार ४०२ रुपयांची पाणी पट्टी आल्याने त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

गवारेनगर,श्रीराम अपार्टमेंट येथील रहिवासी सुधाकर बाजीराव पवार (वय-६०) या जेष्ठ नागरिकांने थेट आपण नळ जोडणी घेतलेली नसताना आपल्याला पाणी पट्टी आकारली असल्याचा सप्रमाण दावा केला आहे.त्यात त्याने पाणी पट्टी बिल जोडून कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे कडे तक्रार दिली आहे.आता अधिकारी काय भूमिका घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव नगर परिषदेच्या आपल्या कारभाराच्या बहुविध कहाण्या नागरिकांनी यापूर्वी अनुभवल्या आहेत.त्यात पालिकेला पाण्याची गरज नसताना पाण्याची मागणी,पाणी तलावातून नेत्यांच्या पाणी चोरीवर मौन,वितरण व्यवस्थेची ऐसी-तैसी,काही आदरणीय नागरिकांना व लाडक्या आजी-माजी नगरसेवकांना चोवीस तास तर काहींना बारा तास,आठ तास पिण्याचे पाणी पुरवठा,विविध ठेकेदारांकडून बीले काढताना अवैध कमिशन वसुली,लाडक्या नगरसेवकांचे वा त्याच्या पित्यांचे अतिक्रमण व त्याकडे दुर्लक्ष करणे,नेता पुरस्कृत ठेकेदारी,स्वच्छता विभागात ठेकेदाराने वजन वाढण्यासाठी कचरा गाडीत दगड टाकणे,नव्याने टाकलेल्या वितरण व्यवस्थेची तपासणी न होता शिफारस पत्रे,आरक्षणात आपल्या मर्जीनुसार फेरफार आदी प्रताप पालिकेस नवे नाही.आता पाणी पुरवठा विभागाचे आणखी एक प्रकरण समोर आले असून यात गवारेनगर,श्रीराम अपार्टमेंट येथील रहिवासी असलेल्या सुधाकर बाजीराव पवार (वय-६०) या जेष्ठ नागरिकांने थेट आपण नळ जोडणी घेतलेली नसताना आपल्याला पाणी पट्टी आकारली असल्याचा सप्रमाण दावा केला आहे.त्यात त्याने पाणी पट्टी बिल जोडून कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे कडे तक्रार दिली आहे.

हिच ती नळ जोडणी नसताना कोपरगाव नगरपरिषदेकडून आलेली पाणी पट्टी.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण गवारेनगर येथील,’श्रीराम अपार्टमेंट’ येथील रहिवासी असून आपण या पूर्वी दि.१५ सप्टेंबर २०१८ रोजी अर्ज करून नळजोडणी मागितली होती.त्यावर पालिकेने आपल्याला कार्यादेश क्रं.१५५६ दि.०६ ऑक्टोबर २०१८ रोजी देऊन त्या नुसार अर्जदारांने त्याची रीतसर नळजोडणी पावती क्रं.४३५३ दि.०६ ऑक्टोबर २०१८ रक्कम भरली होती.व आपल्याला नवीन ०.५ इंचाची नळजोडणी क्रमांक देत असल्याचा खुलासा केला होता.त्यावर संबंधित अधिकारी नारायण साबळे यांनी शेरा मारला असून त्यात,” १/२ इंच नळ जोडणी देणे,मुख्य जलवाहिणीवर नळ जोडणी देऊ नये,रजिस्टरला नोंद घेणे” असे शेरे मारले आहेत.

प्रत्यक्षात पाणीपुरवठा विभागाने त्यांना नळजोडणी दिलीच नाही असा अर्जदाराचा आरोप आहे.यावर सदर अर्जदार सुधाकर पवार यांनी आपल्याला नळजोडणी दिलेली नाही.त्यामुळे वारंवार तक्रारी केल्या आहेत.त्यात दि.०५ मार्च २०२२,स्मरण पत्र दि.०३ ऑक्टोबर २०२२,दि.२९ डिसेंबर २०२२ आदी क्रमांकाने व तारखेने पाठपुरावा केला आहे.मात्र त यावर सदर पाणीपट्टी माफ केलेली नाही हे विशेष ! त्या अर्जावर अन्य नागरीक नानासाहेब विश्वासराव गायकवाड,रवींद्र साहेबराव गाढे आदींच्या सह्या आहेत.व त्यांनी आपली पिण्याचे पाणी न मिळालेली पाणी पट्टी रद्द करावी अशी मागणी केली आहे.त्यावर पाणी पूरवठा विभाग व मुख्याधिकारी पाणीपुरवठा विभागावर काय कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close