कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव पालिकेसमोर महापुरुषांचे जुने पुतळे बसवा-…या नेत्याची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध अर्धाकृती पुतळे नगरपरिषदेत बंदिस्त असून सर्व महापुरुषांचे पुतळे नूतन इमारतीसमोर बसविण्यात यावे अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांव्ये केली आहे.
देशाच्या सामाजिक-राजकीय इतिहासात अमूल्य योगदान देणाऱ्या आणि हा देश घडवणाऱ्या महापुरुषांचे,धुरिणांचे पुतळे हे त्यांची आठवण करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेतच.नव्या पिढीपुढे देशाचा इतिहास दृश्यरूपात आणण्यासाठी ते गरजेचेही आहे.मात्र,याचा अर्थ पुतळ्यांची उंची आणि आकार यांवरून राजकारण व्हावे असा मुळीच नाही.पुतळे हे काही स्पर्धा करण्याची आणि राजकारणासाठीची साधनं नव्हेत.त्यांच्या उभारणीमागील उदात्त हेतू आपण सर्वांनी लक्षात असू द्यावा.कोणाचा पुतळा किती उंच हे महत्त्वाचे नाही,’अशा स्पष्ट शब्दांत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ घडविणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपले विचार चार वर्षांपूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारल्यावर एका मुलाखतीत व्यक्त केले होते ते आजही तितकेच महत्वाचे असल्याचे दिसते.अन्यथा कोपरगावात पुतळ्यांचे श्रेयवादाचे किसळवाणे राजकारण शिजले नसते.कोपरगावात अण्णाभाऊंचा पुतळ्याचे उदघाटन तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते व काळात होऊ नये यासाठी शिजलेले राजकारण शहर वासीयांना नवे नाही.त्यासाठी त्यांच्या हस्तकाकरवी अनेक नेत्यांनी खोडा घातला होता.त्याच्या अधिकृत उडघाटनासाठी नुकतेच एक आंदोलन झालेले असल्याने ती घटना ताजी आहे.आता यात आणखी एका नव्या मागणीची भर पडली असून त्यात माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नव्याने बसवलेले छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या आधी असलेले अर्धाकृती पूतळे आता नवीन नगरपरिषद इमारतीच्या समोर असलेल्या जागेत बसविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
दरम्यान या तीनही अर्धाकृती पुतळ्यांसोबतच महात्मा गांधीजी,महात्मा ज्योतीबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,राजर्षी शाहू महाराज स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचेही पुतळे सन्मानपूर्वक बसविण्यात यावेत अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे..
आपल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”नगरपरिषदेच्या आवारात एकाच ठिकाणी हे सर्व पुतळे बसविल्यास सदरच्या पुतळ्यांची दैनंदिन स्वच्छता व पूजनही होईल.पुतळे सुरक्षितही राहतील.नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नगरसेवक,अधिकारी-कर्मचारी व नागरिक यांना नित्यनेमाने या महापुरुषांचे दर्शन होऊन नगरपरिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्या पासून प्रेरणा घेतील असा (भाबडा )आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.