जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नगरपरिषद निवडणुक,प्रशासनाची तयारी सुरु-मुख्याधिकाऱ्यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहेत.राज्य निवडणूक आयोगानं याबद्दलचे संकेत दिले आहेत.त्यामुळेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पातळीवर कोपरगाव नगर परिषद हद्दीतही हा कार्यक्रम सुरु झाला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे प्रभारी तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामास लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

दरम्यान दि.१ जुलै २०२३ दिवशी अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.त्यामुळे निवडणूक आयोगानं रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होऊ शकतात.त्यामुळे लवकरच राज्यभरात निवडणुकांचा धुरळा उडू शकतो त्या नुसार कार्यक्रम सुरु होणार आहे.

राज्यात कोविड संकट,त्यानंतर राज्यात सुरू झालेला सत्तासंघर्ष,शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे राजकीय घडामोडी वेगानं सुरू आहेत.राज्यातील अनेक महानगरपालिका,नगरपालिका,नगर परिषदांचा कालावधी पावणेदोन वर्षा पूर्वीच संपला आहे.त्यामुळे इथला संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांना आगामी नगरपरिषदच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.त्यामुळे आता प्रस्थापित काळे,कोल्हे,राष्ट्रवादी,भाजप,शिवसेना,काँग्रेस,मनसे,आदी सर्वच राजकीय पक्ष कामास लागणार आहे.

दरम्यान दि.१ जुलै २०२३ दिवशी अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.त्यामुळे निवडणूक आयोगानं रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होऊ शकतात.त्यामुळे लवकरच राज्यभरात निवडणुकांचा धुरळा उडू शकतो.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषद आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्याशिवाय कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होतील असा कयास व्यक्त होत आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.अनेकांनी नवीन मतदार नोंदणीस पुढाकार घेण्याचे प्रयोजन केले आहे त्याचा नूतन मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close