जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान द्या-…या नेत्याची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असून चालू वर्षी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडे केली आहे.

“चालू वर्षी कोपरगाव मतदार संघात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर पेरण्या केल्या आहेत.मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहेत-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

शेतकरी बांधवांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाऊस तसेच वादळी वारे व पूर परिस्थिती ही निर्माण झालेली होती.या नैसर्गिक आपत्तीचा फटका हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण भागाला बसला होता.अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी-२०२२ सुद्धा प्रकाशित झालेली आहे.महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकरी या अतिवृष्टी नुकसानीच्या कचाट्यात सापडलेले होते. त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकरी बांधवांना दिल्यास देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ जाहीर केलेली होती.अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या निकषाच्या दुप्पट रकमेने नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत देण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केलेली होती.त्या अंतर्गत जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये तर बागायत पिकाच्या नुकसानी करिता हेक्टरी २७ हजार रुपये तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानी करिता हेक्टरी ३६ हजार रुपये शासनाने देण्याचे ठरवले होते.आणि या अतिवृष्टीचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे.तर काही ठिकाणी अद्याप त्यास प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्यासाठी आ.काळे यांनी मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.

त्यांनी त्यात पुढे म्हटले आहे की,”मागील वर्षी सप्टेंबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात सुरेगाव व पोहेगाव मंडलातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते.या अतिवृष्टीमध्ये एकूण १८,३२३ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सदरच्या नुकसानीचे पंचनामे होवून १०,७१६ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळालेले आहे.परंतु अजूनही ७,६०७ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तसेच कोपरगाव,दहेगाव बोलका व रवंदे मंडलातील २७,२०० शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील तातडीने नुकसान भरपाई अनुदान मिळणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close