कला व सांस्कृतिक विभाग
जेष्ठ नागरिक हि अनुभवाची विद्यापीठे-कोपरगावात प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानातील तरुण पिढीने आपल्या आयुष्याला उब देणारी जेष्ठ माणसं सांभाळावित,जेष्ठ नागरिक हि अनुभवाची विद्यापीठे असून ती आपल्या संकट काळात ते योग्य मार्गदर्शन करून धिर देऊन आधार देत असल्याचे प्रतिपादन शब्द गंध साहित्यिक परीषद अ.नगर शाखेचे प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र फंड यांनी कोपरगाव येथील एका समारंभात व्यक्त केले आहे.
“आजच्या काळात समाजात जे काही चालू आहे त्याला जनताही जबाबदार आहे.जनतेने विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे”-राजेंद्र कोयटे,कवी,कोपरगाव.
शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने व राष्ट्र भाषा सेवा मंच,स्व.र.म.परिख हिंदी तथा मराठी सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती,निमित्त व राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराचे मानकरी राजेंद्र फंड यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी कवी राजेंद्र कोयटे हे होते.
सदर प्रसंगी जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदिप वपॆ,अध्यक्ष कैलास साळगट,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे,कुंभारी येथील वाचनालयाचे रमन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना संदिप वर्पे म्हणाले की,”वाचनालयाच्या माध्यमातून मने समृद्ध होतात,प्रत्येक घरात एक छोट वाचनालय असलं पाहिजे,आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेले ग्रंथ मी मनःपूर्वक वाचून संग्रही ठेवले आहेत.कोपरगाव शहरातील जेष्ठ लेखक डॉ.दादासाहेब गलांडे,मंसाराम पाटील आदी लेखक आहेत.
सदर प्रसंगी इतिहासाचे अभ्यासक विठ्ठल मैंदड,कार्यकर्ते अशोक आव्हाटे,छायाचित्रकार हेमचंद्र भवर,कवी कैलास साळगट,नंदकिशोर लांडगे,मधुमिता निळेकर आदींनी शेतकरी व अन्य विषयावर कविता सादर करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.
या प्रसंगी शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य अहमदनगर शाखेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांना नुकताच राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव शाखेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.प्रमोद येवले यांच्या वाढदिवसानिमित्त गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय दवंगे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.मधुमिता निळेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन हेमचंद्र भवर यांनी मानले आहे.