कला व सांस्कृतिक विभाग
‘कोण होणार करोडपती’त कोपरगावच्या तरुणांचे यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील सुरेगाव येथील संजय सुंदरराव कदम यांचे चिरंजीव चि.संकेत कदम यांने नुकतेच “कोण होणार करोडपती” या सोनी मराठी टी.व्ही.मालिकेत सहभागी होऊन अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रश्नावलीला उत्तर देऊन मोठे यश संपादन केले आहे त्याबद्दल कदम परिवाराचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अ.’नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे यांनी सत्कार केला आहे.
‘कोण होईल मराठी करोडपती ? हा ई टीव्ही मराठी वाहिनीवर सादर झालेला एक गेम शो आहे.सोनी हिंदी वाहिनीवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे हा आता सोनी मराठीत प्रसिद्ध होत आहे.त्यात चि.संकेत कदम याने सहभाग नोंदवला होता.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी ज्ञानेश्वर भगत,माधव नाना जगताप,राहुल गवळी,चंद्रहार जगताप व इतर उपस्थित होते.चि.संकेत हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे,त्यासाठी सर्वांनी त्याला भविष्यात यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदरचा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर आज व उद्या म्हणजे दि.१ ऑगस्ट व २ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ०९ ते १० यावेळेत दोन्ही दिवशी प्रसारीत होणार आहे,तरी सर्वांनी हे दोन्ही भाग अवश्य बघावेत असं आवाहन नितीन शिंदे यांनी केले आहे.