ऊर्जा विभाग
कोपरगाव तालुक्याला मिळणार पूर्ण दाबाने वीज !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून मोठा संताप असताना त्याची पूर्तता करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही.वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे सलग्न लाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच चासनळी वीज उपकेंद्राला शहा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

निवडणुका पाहून उद्घाटन आणि भूमिपूजन यात कोपरगाव तालुक्यातील नेत्यांचा कोणी हात धरणारा नाही.त्यामुळे या गोष्टी सर्रास घडून येत असतात आणि मतदारही मोठ्या मनाने नेत्यांना माफ करत असतात.अशीच घटना शहा आणि पांचाळे मधील माळरानावर घडली होती.मात्र दोन वर्षांनी अद्याप वीज मिळाली नव्हती आता ती मिळणार असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा केला आहे.
कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग तर सिन्नर तालुक्याचा पूर्व भागासाठी पूर्ण दाबाने वीज देणाऱ्या व शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या शहा येथील महावितरण कंपनीच्या १३२ के.व्हीं.उपकेंद्राचे काम जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण होऊन त्याचे वाजतगाजत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ढोल बडवून उद्घाटन करण्यात आले होते.त्यावेळी आगामी १५ दिवसात पुरेशा दाबाने शेतकऱ्यांना वीज मिळणार असल्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.मात्र त्यांनंतर दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज हे दिवास्वप्न ठरले होते.निवडणुका पाहून उद्घाटन आणि भूमिपूजन यात कोपरगाव तालुक्यातील नेत्यांचा कोणी हात धरणारा नाही.त्यामुळे या गोष्टी सर्रास घडून येत असतात आणि मतदारही मोठ्या मनाने नेत्यांना माफ करत असतात.अशीच घटना शहा आणि पांचाळे मधील माळरानावर घडली होती.आता त्या उपकेंद्रातुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळणार असल्याची दुसरी बातमी उद्घाटन करणारे आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
सदरचे उपकेंद्र सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातील १३२ के.व्ही.सबस्टेशनवर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होणार असून कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार असल्याचा दावा केला आहे.तसेच वारंवार रोहित्र नादुरुस्त होणे व शेतकऱ्यांचे वीजपंप जळणे आदी समस्या सुटणार आहे.शहा वीज उपकेंद्राला चासनळी उपकेंद्रा बरोबरच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,सुरेगाव उपकेंद्र देखील जोडली जाणार जाणार असून या वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम प्रगतीपथावर आहे.त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याचा देखील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे चासनळी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या चास,हंडेवांडी,कारवाडी व परिसरातील गावातील शेतकरी,व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान शहा १३२ के.व्ही.वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे कोणत्याही क्षणी वीजपुरवठा सुरु होणार असल्यामुळे सदर वीज वाहिनीशी नागरीकांनी आपला कोणत्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.