जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ऊर्जा विभाग

शिर्डी शहरासह संपूर्ण मतदार संघ सौरयुक्त होणे गरजेचे-…या नेत्याचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)


“देशात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे सौर ऊर्जेच्या दृष्टीने हा शिर्डी शहरासह संपूर्ण मतदार संघ स्वयंपूर्ण झाला पाहिजे.त्यासाठी आपण केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांना आणण्याची जबाबदारी घेतअसल्याचे प्रतिपादन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“शिर्डीला पर्यावरणपूरक सौर शहर करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५० मेगावॅट क्षमतेचा सौर वीजेचा पुरवठा करण्यात येणार आहे.त्यात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक,सार्वजनिक सेवा,सरकारी कार्यालये आदींचा समावेश आहे”- प्रसाद रेशमे,प्रकल्प संचालक,महावितरण,सौर प्रकल्प.

  

  देशभरातील १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण शिर्डी शहराला सौर शहर करण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे.यामध्ये अनुदानदेखील मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर महावितरणच्या शिर्डी उपविभागाच्यावतीने शिर्डीतील शांती कमल भक्तनिवास येथे विद्युत अभियंत्यासह वित्तीय संस्था,सौर प्रणाली कंपन्यांसह,’ग्राहक संवाद मेळावा’ आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.

प्रास्तविक करताना महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर दिसत आहे.

   याप्रसंगी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर,कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे,नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर,अधीक्षक अभियंता रमेश पवार,शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश दिघे,अखिल भारतीय नवीकरणीय उर्जा असोसिएशनचे अध्यक्ष साकेत सुरी,कार्यकारी अभियंता अनिल थोरात व जनसंपर्क अधिकारी विकास आढे,सहाय्यक अभियंता बी.डी.पाटील आदीसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

सदर प्रसंगी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर मार्गदर्शन करताना  दिसत आहे.

त्यावेळी पुढे बोलताना खा.वाकचौरे म्हणाले की,”आपण शिर्डीत मुख्यकार्यकारी अधिकारी व नंतर विश्वस्त असताना वीज गेल्यास ऊर्जेवर मोठा खर्च होत होता.त्यासाठी आपण सन -2005 साली पवन ऊर्जेला गती दिली होती.त्यामुळे साई संस्थांच्या वीज बिलात कोट्यवधीची बचत झाली होती.आगामी काळात साई संस्थांनने सौर ऊर्जेला प्राधान्य देत सर्व इमारती आणि पाणी योजना आदी ठिकाणी रुफ टॉप निर्माण करणे गरजेचे आहे.मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.शिर्डी पासून पश्चिमेस दुष्काळी गावे असून त्यांनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.त्यास महावितरण कंपनीने प्राधान्य देणे गरजेचे आहे.ती गावे सौर ग्राम होऊ शकतात.त्या ग्रामपंचायती मदत करायला तयार आहे.त्यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी हाताने इशारा करत हिरवा कंदील दाखवला आहे.जवळच जंगली महाराज आश्रम,सहकारी साखर कारखाने आहे.वीज मंडळाने नफा कमी करून मदत करावी असे आवाहन करून त्यांनी ‘सुभस्य शिघ्रम’ म्हणून पुढील आठवड्यात काम सुरू करावे स्थानिक बँकांनी त्यांना वित्तीय सहाय्य करावे असे आवाहन शेवटी खा.वाकचौरे यांनी केले आहे.


    दरम्यान सदर प्रसंगी बोलंताना प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे म्हणाले की,”शिर्डीला पर्यावरणपूरक सौर शहर करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५० मेगावॅट क्षमतेचा सौर वीजेचा पुरवठा करण्यात येणार आहे.शिर्डी शहरातील घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक,सार्वजनिक सेवा,सरकारी कार्यालये या वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.त्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे.या योजनेचा शिर्डी शहरातील सर्व वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

सदर प्रसंगी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले की,”शिर्डी शहराला आंतरराष्ट्रीय ओळख असून शिर्डीतील सर्व शासकीय कार्यालये सौर उर्जेवर आणण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे सांगितले.सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन ही योजना राबविल्यास शिर्डी शहर सौर होण्यास अडचण येणार नाही.

   

  सदर प्रसंगी “महावितरणचे मुंबई येथील कार्यकारी संचालक धंनजय औंढेकर म्हणाले की,”रूफ सोलर बसवले तर तुम्ही पाच झाडे लावल्यासारखे आहे.त्यामुळे तुम्ही वातावरणातील कार्बन कमी करत आहात.सप्टेंबर अखेर आपल्याला मीटर महावितरण देणार आहे.वितरकाना ऑफीसला येण्याची गरज नाही.सौर उर्जेचा वापर वाढल्यास भविष्यात वीज जोडणीसाठी कुणालाही महावितरणच्या कार्यालयात येण्याची गरजच राहणार नाही.त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यावर महावितरणचा भर राहणार आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शिर्डी सौर शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली.शिर्डी सौर शहर करण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य लाभत असून लवकरच सौर शहर म्हणून शिर्डी नावारूपाला येईल, असेही त्यांनी सांगितले.

सदर प्रसंगी विनोद गोंदकर म्हणाले की,”सूर्यप्रकाश किमान पातळीवर आहे.सोलर बसविल्यानंतर आता बिल कमी होऊन प्रती महिना २५ हजार फायदा झाला आहे.कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी मदत मिळणे गरजेचे आहे.२० वॅट पेक्षा जास्त वापर आहे त्यांना ऊर्जेचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे.विमा संरक्षण बाबत जागृती करणे गरजेचे आहे.

यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे,सौर ग्राहक विनोद गोंदकर,रमेश गोंदकर,भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला महावितरणच्या संगमनेर व शिर्डी उपविभागातील अभियंते,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी ग्राहकांना माहिती देण्यासाठी सौर एजन्सी आणि वित्तीय संस्थांनी स्टॉल्स उभारले होते.

   दरम्यान शिर्डीत वाणिज्यिक अस्थापनांची (हॉटेल व्यावसायिकांनी ) बैठक हॉटेल निमट्री या ठिकाणी संपन्न झाली आहे.सदर प्रसंगी रतीलाल लोढा,विनोद गोंदकर,नरेंद्र लोढा आदींनी हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या आहेत.०३ किलो वाट्साठी अनुदान दिले जात आहे ते वाढवून मिळावे.सदर प्रसंगी विनोद गोंदकर,नंदू लोढा आदींनी आपल्या समस्या मांडल्या आहेत.सदर प्रसंगी विनोद गोंदकर सौर वीज तीन रुपयांनी घेतात पण व्यावसायिकांना ती १५ रुपयांनी घ्यावी लागते यातील फरक दूर करावा.हॉटेलला इंडस्ट्रीज दर्जा देऊन त्याची त्या प्रमाणे बिल आकारणी करावी.

सदर प्रसंगी औंढेकर म्हणाले की,”हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत लोकप्रतिनिधी कडून अथवा उद्योगांकडून सी.एस.आर.फंड,खासदार,आमदार निधी मधून हा प्रश्न मार्गी लावता येईल.आगामी काळात शेतकऱ्यांची वीज वापर व सौर निर्मिती ऊर्जेमुळे कमी होणार असल्याने तो दर धोरणात्मक भाग असला तरी आगामी काळात बंद होऊ शकणार आहे.त्या समस्यांबाबत त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.उपस्थितांचे आभार संगमनेर येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close