जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ऊर्जा विभाग

मोफत वीज योजनेबाबत उद्या…या शहरात संवाद !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मोफत वीज योजनेबाबत शिर्डीत ४ सप्‍टेंबर रोजी संवाद मेळावा*च्या माध्यमातून घराच्या छतावर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्यास इच्छुक असलेल्या शिर्डीमधील घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी ४ सप्टेंबर रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शांती कमल भक्त निवास येथे सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात योजनेची माहिती दिली जाणार असून, तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

  

देशभरातील १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे.शिर्डी शहराला सौर शहर करण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्यात येणार आहे.

  देशभरातील १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण शिर्डी शहराला सौर शहर करण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे.यामध्ये अनुदानदेखील मिळणार आहे.यामुळे ग्राहकांचे विजेचे बिल कमी होणार असून,गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास ती वीज कंपनीला विकून उत्पन्नही मिळवता येईल.

   महावितरण,शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान,जिल्हा प्रशासन आणि महाऊर्जा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत शिर्डीला संपूर्ण सौर शहर करण्याचा नुकताच निर्णय झाला आहे. त्यानुसार,शिर्डी शहरातील घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक,सार्वजनिक सेवा,सरकारी कार्यालये आदी सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.वीज ग्राहकांना या योजनेची विस्तृत माहिती देण्यासाठी आणि वित्तीय सहाय्य मिळवून देण्यासाठी ग्राहक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

   या मेळाव्यात महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे,कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर,नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर,अधीक्षक अभियंता रमेश पवार,कार्यकारी अभियंता अनिल थोरात तसेच वरिष्ठ अभियंते,नोंदणीकृत सौर कंत्राटदार आणि अर्थसहाय्यसाठी वित्तीय संस्था (बँक) उपस्थित असतील.या संधीचा शिर्डी शहरातील सर्व ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.


…या ठिकाणी मोफत जयपूर फूट शिबिर होणार !
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई)  जयपुर  यांचे संयुक्‍त विद्यमाने ०५ वर्षानंतर  पुन्‍हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

दिनांक दि.२६ सप्टेंबर ते दि.३०सप्टेंबर २०२४ या दरम्‍यान श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे मोफत  कृत्रीम पायरोपन  (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्‍यांगासाठी साहित्‍य वाटपाचे आयोजन करणेत आले असून यामध्‍ये गरजु व लाभार्थी दिव्‍यांग व्‍यक्‍तींची तपासणी करणेत येऊन आवश्‍यकतेनुसार दिव्‍यांग व्‍यक्‍तीच्‍या पायाचे माप घेऊन त्‍या मापाचे कृत्रीम पाय रोपण करण्‍यात येणार आहे.नवीन पाय बसविणे बरोबर जुन्‍या कृत्रीम पायाची दुरुस्‍ती देखील सदर शिबीरामध्‍ये मोफत करण्‍यात येईल.याचबरोबर दिव्‍यांगाकरीता आवश्‍यक साहित्‍याचे वाटप देखील शिबीर कालावधीत करण्‍यात येणार आहे.सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थींना श्री साईबाबा संस्‍थान मार्फत राहण्‍याची व दोन वेळच्‍या जेवणाची मोफत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.या शिबीरात भाग घेणेसाठी श्री साईनाथ रुग्‍णालय,शिर्डी येथे नाव नोंदणी सुरु असून दुरध्‍वनी क्र.०२४२३-२५८५५५ वर संपर्क साधुनही नावनोंदणी करता येईल तसेच शिबीरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्‍य ओळखपत्र आणि ०२ पासपोर्ट साईज  फोटो  घेवुन यावे.
तरी जास्‍तीत जास्‍त दिव्‍यांग गरजू व्‍यक्‍तींनी या शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे संस्‍थापक पदमभुषण डी.आर.मेहता यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close