उद्योग
…ही जागा औद्योगिक वसाहतीकडे द्या मागणी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर काही महिन्यापूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी संमती दर्शविली होती.त्यामुळे सदरची जागा तातडीने वर्ग करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.

“राज्य मार्ग ६५ वर बाराही महिने सातत्याने अवजड वाहतूक सुरु असते.या अवजड वाहतुकीचा भार वाहणाऱ्या राज्य मार्ग ६५ चे काम उच्च दर्जाचे होण्यासाठी या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होवून या रस्त्याच्या कामासाठी ए.डी.बी.मार्फत निधी मिळावा”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव मतदार संघातील औद्योगीक वसाहतीचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे.सर्व प्रथम माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या जागेची मागणी करून त्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली होती.त्यानंतर आ.काळे यांनी यात पुढाकार घेवून एम.आय.डी.सी.ला जागा मिळावी यासाठी पाठपुरावा करीत आहे.त्याबाबत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून त्यासाठी कोपरगाव शहरालगत असणारी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची जागा वर्ग झाल्यास जागेचा प्रश्न मिटणार असून एम.आय.डी.सी. उभारण्याला वेग मिळणार आहे.त्यासाठी हि जागा लवकरात वर्ग करण्याबाबत मागणी केली आहे.
तसेच मागील एक वर्षापासून १९१ कोटी निधीतून सुरु असलेल्या ७५२ जी सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.त्यामुळे वाहनधारकांना व नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे त्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.कोपरगाव मतदारसंघातील महत्वाचा राज्यमार्ग असलेल्या राज्य मार्ग ६५ वर बाराही महिने सातत्याने अवजड वाहतूक सुरु असते.या अवजड वाहतुकीचा भार वाहणाऱ्या राज्य मार्ग ६५ चे काम उच्च दर्जाचे होण्यासाठी या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होवून या रस्त्याच्या कामासाठी ए.डी.बी.किंवा हॅम च्या माध्यमातून जास्तीत निधी मिळावा अशी मागणीही आ. काळे यांनी शेवटी केली आहे.