इतिहास
कोपरगावातील पवार सरकार संस्थान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
धार नगरीतील परमारांचा महान क्षत्रिय राजा भोज यांचे वंशज पवार (परमार) मानले जातात.श्रीमंत पवार यांची धार व देवास ही संस्थाने हिंदुस्थानातील मध्यप्रदेश राज्यातील आहे. आदिलशहाच्या काळात ‘शहाजीराजे भोसले’ यांची जहागीरी पुणे, सुपे, बारामती आणि इंदापूर अशा चार ठिकाणी होती. श्रीमंत पवार सरकार घराण्यातील सरदार ‘साबुसिंग पवार’ हे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ‘सुपा’ हे त्यांचे मुळगांव होते. सुपा येथील जहागिरीमुळे ‘भोसले आणि पवार’ घराण्यांचे सख्य तेव्हा पासून आले आहे. पुढे पवार घराणे ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले’ यांचे सैन्यात सामिल झाले. शिवाजीराजे यांच्या कल्याणच्या मोहिमेत सरदार पवार सहभागी असल्याचा उल्लेख आहे. त्यांना ‘कृष्णाजी’ नावाचे पुत्र होते. हे शिवकाळात ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले’ यांचेकडे एका सैन्य तुकडीचे नेतृत्व करित होते.

पाणिपतच्या युध्दातही पवार सैन्याची कामगिरी पहावयास मिळते.अफगाणिस्थान वरून बलाढ्या सैन्य घेवून हिंदूस्थानवर आक्रमण करून आलेला अहमद शहा अब्दालीला पाणिपत येथे सन १७६१ च्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याला मराठा साम्राज्याच्या शूरवीर सैन्याने कडवी झुंज दिली होती.या कडव्याझुंजीत अनेकांना वीरमरण आले.यात ‘मराठा सरदार यशवंतराव राजे आनंदराव पवार’ यांना वीर मरण आले होते.
शाहु छत्रपती महाराजांनी १७ व्या शतकात मराठा साम्राज्य विस्तारात पहिला बाजीराव पेशवा सरंजाम देण्याचे अधिकार दिले. छत्रपतींच्या साम्राज्य विस्तारात मध्य हिंदुस्थान स्वारीत पवार सैन्याची चमकदार कामगिरी केली. पवार घराण्यातील सैन्य तुकडी युध्दात ‘तलवार व शस्त्रास्त्र’ चालविण्यात ‘पारंगत व कुशल’ समजली जात असे. या कामगिरीमुळे पवारांना ‘धार देवास’ सह काही परगाणे ‘सरंजाम’ म्हणून दिले. पवार घराण्याला ‘सरकार’ या उपाधीने सन्मानित करून संस्थानच्या कारभारास स्वतंत्रपणे सुरूवात झाली. पवार सरकार संस्थानात ‘धार्मिक व महसूल’ जमा करण्याचे अधिकार होते.

गोदावरी तीरावरील कोपरगांव तालुक्यात ‘श्रीमंत पवार सरकार’ यांचे दोन वाडे (कोपरगांव व जेऊरकुंभारी) आहेत. श्रीमंत पवार सरकार हे ‘शिवभक्त’ असल्याने गोदावरी तिरावर कोपरगांव तालुक्यात महादेवाची मंदिरे उभारली आहे.तीन महादेव मंदिरे यात कोपरगांवातील पवार सरकार वाड्याजवळ “सोमेश्वर महादेव मंदिर”, बेट येथील संजीवनी पाराजवळ “श्रीमंत महादेव मंदिर”, जेऊरकुंभारी येथील गोदावरी नदी लगत “गंगेश्वर महादेव मंदिर” अशी तीन मंदिरे श्रीमंत पवार सरकार यांनी बांधली आहे.
पाणिपतच्या युध्दातही पवार सैन्याची कामगिरी पहावयास मिळते.अफगाणिस्थान वरून बलाढ्या सैन्य घेवून हिंदूस्थानवर आक्रमण करून आलेला अहमद शहा अब्दालीला पाणिपत येथे सन १७६१ च्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याला मराठा साम्राज्याच्या शूरवीर सैन्याने कडवी झुंज दिली होती.या कडव्याझुंजीत अनेकांना वीरमरण आले.यात ‘मराठा सरदार यशवंतराव राजे आनंदराव पवार’ यांना वीर मरण आले होते.

श्रीमंत पवार संस्थानचा विस्तार आणि विभाजन पहावयास मिळते. देवासचे पवार सरकार संस्थान ‘थोरली आणि धाकटी’ (सिनिअर आणि ज्युनिअर) अशा दोन पातीत विभाजन झाले. पवार सरकार संस्थानच्या अधिपत्याखालील गावात अनेक सुधारणा झालेल्या पहावयास मिळतात. श्रीमंत पवार यांनी इंग्रज कालखंडात पवार सरकार संस्थानात केलेल्या लोकहीत कारभारामुळे ‘महामहिम’ या किताबांनी सन्मानित केले.

श्रीमंत पवार सरकार संस्थानात शिक्षण, आरोग्य व जकात व्यवस्था सोडली तर दोन्ही पात्यांचा कारभार स्वतंत्र होता. दोन्ही पात्यात स्थानिक स्वराज्य, शिक्षण, वीजपुरवठा, पाणी पुरवठा, बँका, वन संरक्षण, वृत्तपत्रे, दुर्बलांचा उध्दार, अस्पृश्यता निवारण, औद्योगिकरण, छापखाना अशा अनेक बाबींत सुधारणा झाल्या आहेत. श्रीमंत पवार सरकार यांचा कारभारात रयतेच्या गरजा आणि उध्दाराचे हीत होते. स्वतंत्र भारतात सन १९४८ मध्ये ‘श्रीमंत पवार सरकार’ यांची दोन्ही संस्थाने त्यावेळच्या मध्य भारत संघात विलीन झाली. श्रीमंत पवार सरकार संस्थानीकांना ‘महाराज’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. १५ तोफांची सलामीचा मान श्रीमंत पवार सरकार यांना होता.
गोदावरी तीरावरील कोपरगांव तालुक्यात ‘श्रीमंत पवार सरकार’ यांचे दोन वाडे (कोपरगांव व जेऊरकुंभारी) आहेत. श्रीमंत पवार सरकार हे ‘शिवभक्त’ असल्याने गोदावरी तिरावर कोपरगांव तालुक्यात महादेवाची मंदिरे उभारली आहे.तीन महादेव मंदिरे यात कोपरगांवातील पवार सरकार वाड्याजवळ “सोमेश्वर महादेव मंदिर”, बेट येथील संजीवनी पाराजवळ “श्रीमंत महादेव मंदिर”, जेऊरकुंभारी येथील गोदावरी नदी लगत “गंगेश्वर महादेव मंदिर” अशी तीन मंदिरे श्रीमंत पवार सरकार यांनी बांधली आहे. तसेच बीजगुणन प्रक्षेत्र (कृषी तंत्रज्ञान चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्र करिता जमीन टाकळी चौफुली), गोदावरी नदीपात्रातील टेकडी अशा शेकडो वर्षापुर्वीच्या खुणा आजही पहावयास मिळतात.
श्रीमंत पवार सरकार’ यांचा कोपरगांवतील जुने गांवठाणात ‘वाडा’ आहे. पारतंत्र्यात कोपरगांवचे पहिले ‘डाकघर’ याच वाड्यात होते. त्याजवळ ‘श्रीमंत पवार सरकार’ यांनी ‘कोपरगांव वेस’ उभारली आहे. बैल पोळा सणाला श्रीमंत पवार सरकारांच्या यांचे बैल जोडीला ‘प्रथम मानकरी’ म्हणून मान राहिला आहे.
श्रीमंत महादेव देवस्थान
संजीवनी विद्या पार जवळ,बेट-कोपरगांव
श्रीमंत महामहिम पवार सरकार ( देवास ज्युनिअर) संस्थान कडे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीमंत महादेव मंदिराची बांधणी करुन जिर्णोद्धार केला आहे.श्रीमंत पवार सरकार संस्थानात स्वतंत्र वास्तुरचनाकार होते.कोपरगांव तालुक्यातील जेऊर कुंभारी आणि कोपरगांव या दोन वतनांचा कारभार श्रीमंत महामहिम पवार सरकार यांचे कडे होता.जेऊर कुंभारी येथील गोदावरी नदी काठावरील गंगेश्वर महादेव आणि श्रीमंत महादेव ही दोन्ही मंदिरे समकालीन असून यांची अंतर्बाह्य रचना एकसारखी आहे.गाभाऱ्यात शिवलिंग असून गोमुख दिशेने उजेडासाठी झरोका आहे. संपूर्ण मंदिर हे काळ्या रंगाच्या दगडात बांधले आहे. कळसावर चुना,विट यांचा वापर करुन सुबक नक्षीकाम बांधकाम दिसून येते.कळसावर ३६ देवळी असून त्यात विविध देवदेवतांच्या आणि सृष्टीचे ईश्वरीयरुप मुर्ती आहेत. मंदिराच्या समोरच शिवलिंग समांतर उंचीवर काळ्या रंगाच्या दगडात कोरलेली नंदीची मुर्ती आहे.गाभाऱ्यात अखंड दिप सेवा सुरु आहे. मंदिराच्या दरवाजा लगत बाहेरील दोन्ही बाजूस देवळी असून बाहेरील सभा मंडप काम अपुर्ण अवस्थेत आहे.श्रीमंत महामहिम यशवंतराव पवार सरकार हे या मंदिरात दर्शनासाठी येत असत. देवस्थान वतीने श्रीमंत पवार सरकार संस्थानचे भारतवर्ष परंपरागत सण-उत्सव साजरे केले जातात.
इतिहासात पराक्रम गाजविलेले… धर्मरक्षणाचे कार्य केलेले… उत्तम प्रशासक असलेले… ‘श्रीमंत महामहीम-सरकार-महाराज अशा उपाध्यांनी सन्मानीत झालेले… धार-देवासचे श्रीमंत महामहिम पवार सरकार संस्थानला त्रिवार मानाचा मुजरा…!
————————————————————-
महेंद्र (बाळासाहेब) पाटील
प्रमुख तथा जनरल मुखत्यार,
सुशांत घोडके
मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीमंत महामहिम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान,महादेव देवस्थान,कोपरगांव तालुका.
संकलन : गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ.


