जाहिरात-9423439946
इतिहास

लखुजीराव जाधवरावांचे वंशज कोपरगावात-डेंगळे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे
 

   स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या लखुजीराव जाधवरावांचे वंशज कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे असून त्यांनी येथे मिळालेल्या वतनावरून देशमुख हे नाव धारण केले असून कुंभारी हे त्यांचे मूळ परगण्याचे गाव होते.मात्र त्यांचा विस्तार होऊन ते नंतर माहेगाव देशमुख येथे स्थायिक झाले होते.त्यांच्यातील नंतर प्रसिद्ध पुरुष नारायणराव देशमुख हे होते.त्यांनीच त्या काळात माजी आ.स्व.मोहनराव गाडे आणि माजी खा.शंकरराव काळे यांना मदत केली असल्याचा खुलासा इतिहास संशोधक आणि ऐतिहासिक वाडे आणि घराणी हा पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांनी आज कोपरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात केला आहे.

   

इतिहास संशोधक आणि ऐतिहासिक वाडे आणि घराणी हा पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे कोपरगावात बोलताना.

“तत्कालीन कालखंडात कुंभारी हा परगना होता.मात्र त्या काळी त्यांना एकांनी सुचवले की स्त्रीलिंगी गावात राहू नये म्हणून ते माहेगाव येथे गेल्याची आख्यायिका आहे.त्यांना माहेगाव देशमुख येथील ५२ गावची देशमुखी होती.त्यांना राजे म्हटले जात असे.ते जिजाबाईचे वडील लखोजी जाधवराव यांचे नातेवाईक व वंशज होते.यशवंतराव जाधवराव हे जेऊर कुंभारी येथे वतन बघायला आले होते.त्यांना हत्तीच्या अंबारीचा मान होता.आज ते देशमुख म्हणून ओळखले जातात”-सुमित डेंगळे,इतिहास संशोधक,पुणे.

   मकरसंक्रांती-१७६१ पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या “शौर्य दिवसा” निमित्त कोपरगावात आज ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांचे व्याख्यान सायंकाळी ०५.३० वाजता कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगांव येथे आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी सदर प्रसंगी न्या.संजय खैरनार,ॲड.अशोक देशमुख,कोपरगाव नगरपरिषदेचे  माजी अध्यक्ष विजय वहाडणे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.जयंत जोशी, ॲड.संजय भोकरे,सुमित घोडके,महेंद्र पाटील आदिसंह बहुसंख्येने तालुक्यातील मान्यवर घराणी व त्यांचे कुटुंबीय हजर होते.

कोपरगावातील उपस्थित इतिहास चिकित्सक.

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे राजेभोसले परिवार आहे.तो शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी संबंधित आहे तो येथे वतणावर आला होता.ती विठोजी भोसले यांची शाखा आहे.नागोजी भोसले हे मंजूर येथील आहे.सुरेगाव येथे जानराव वाबळे हे सरदार घराणे आहे.नाईक,निंबाळकर हे राजघराणे आहे.संवत्सर शिंदे हे पाटीलकीचे वतन आहे.सडे येथील बारहाते सरदार घराणे आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहराची आणि तालुक्याची भूमी ही पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची आहे.मात्र हे वास्तव अनेकाना आज माहिती नाही हे दुर्दैव आहे.”राघोबा दादाचे गाव तर पवार यांच्या वतनाचे गाव म्हणजे कोपरगाव आहे.महाराष्ट्राचा शौर्यशाली इतिहास शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू झाला.संभाजी महाराज आणि नंतर ताराराणी आदींनी स्वराज्याचे रक्षण केले.राजाराम आणि ताराराणी यांच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला आणि २/३ देशावर कब्जा केला होता.पुढे दिल्लीपतीनी मराठ्यांची मदत मागितली होती.बडोद्याचे गायकवाड,ग्वाल्हेरचे शिंदे,धारचे पवार,इंदूरचे मल्हारराव होळकर आदी घराणे उदयाला आली.पानिपत लढाईत दत्ताजी शिंदेंची हत्या झाली त्यावेळी मराठे खवळले होते.पानिपतचे युद्ध ही १८ व्या शतकातील व जगातील सर्वात मोठे युद्ध होते.एक लाख लोक बळी गेले आहे.बखरीत एक लाख बांगडी फुटली असा उल्लेख आहे.

श्रीमंत राघोबा दादा पेशवे.

१७ व्या शतकात नावारूपाला आलेले पवार घराणे हे मूळ सुपे येथील होते.नंतर साबाजी पवार,कृष्णाजी पवार हे संभाजीच्या काळात होते.पुढे बुवाजी पवार ताराराणीच्या यांच्या काळात होते.पवारांचे चारही जण मराठ्यांच्या साम्राज्याच्या विस्तारात होते.पुढे मराठ्यांचे विस्तार झाला त्यात धार आणि देवास दोन शहरे दिली होती.पुढे तुकोजी आणि जीवाजी हे दोन भाऊ देवासला गेले होते.जीवाजिकडे कोपरगावाची वतनदारी मिळाली होती.त्या काळी सरदारकी गेली तरी वतने जप्त होत नव्हती.पवारांचे देवासला राज्य होते तर वतन जिवाजीला कोपरगावचे वतन दिले होते.

   सदाशिवराव भाऊ,नानासाहेब पेशवे यांचा मुलगा विश्वासराव,कोपरगावचे रहिवासी यशवंतराव पवार यांचे निधन त्यावेळी झाले.मात्र या लढाईला पराभवाची उपमा दिली होती.मात्र वास्तव वेगळं होते.मराठ्यांनी अब्दालीला असा काही धडा शिकवला की पुन्हा अब्दालीने आणि परकीय शक्तीने पुन्हा भारताकडे मान वाकडी करून पाहिले नाही.अब्दालीने पेशव्यांना तुम्हीच दिल्लीचे तख्त सांभाळा असे पत्र पाठवले होते.हा खरा इतिहास आहे.म्हणजेच दिल्लीचे तख्त राखतो हे उघड झाले होते.अशी माहिती देऊन त्यांनी कोपरगाव तालुक्यातील राजघराणी आणि सरकार घराणी यांची माहिती सांगताना पुढे म्हणाले की,”तत्कालीन कालखंडात जेऊर कुंभारी हा परगना होता.मात्र त्या काळी त्यांना एकांनी सुचवले की स्त्रीलिंगी गावात राहू नये म्हणून ते माहेगाव येथे गेल्याची आख्यायिका आहे.त्यांना माहेगाव देशमुख येथील ५२ गावची देशमुखी होती.त्यांना राजे म्हटले जात असे.ते जिजाबाईचे वडील लखोजी जाधवराव यांचे नातेवाईक व वंशज होते.यशवंतराव जाधवराव हे जेऊर कुंभारी येथे वतन बघायला आले होते.त्यांना हत्तीच्या अंबारीचा मान होता.आज ते देशमुख म्हणून ओळखले जातात.मंजूर येथे राजेभोसले परिवार आहे.तो वतणावर आला होता.विठोजी भोसले यांची शाखा मंजूर येथे आहे.या ठिकाणी आजही राजेभोसले आदी राज घराणे राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.नागोजी भोसले हे मंजूर येथील आहे.सुरेगाव येथे जानराव वाबळे हे सरदार घराणे आहे.नाईक,निंबाळकर हे राजघराणे आहे.संवत्सर शिंदे हे पाटीलकीचे वतन आहे.सडे येथील बारहाते सरदार घराणे आहे.कोपरगाव तालुक्यातील वारी येथे एक उपेक्षित सरदार घराणे आहे.इतिहासाने त्यांचेवर अन्याय केला आहे.रायाजी पाटील शिंदे हे ते सरदार घराणे आहे.आता बरीच घराणी पांगली आहे.

आयोजक सुशांत घोडके.

    कोपरगावला पौराणिक इतिहास आहे.दैत्यगुरू शुक्राचार्यांची ही तपोभूमी आहे.कोपरगाव हे उत्तर किनाऱ्यावर वसले आहे.या तालुक्यात कोकमठाण,संवत्सर,कुंभारी,आदी प्राचीन ठिकाणे आहे.जगात फक्त शुक्राचार्यांचे मंदिर फक्त कोपरगाव येथे आहे.निळकंठ शास्री चौधरी यांनी महाकाव्य लिहिले त्यांना शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाला निमंत्रण दिले होते.१७५० च्या निजाम आणि मराठ्यांच्या लढ्यात हा भाग मराठ्यांनी जिंकला होता व मराठे शाहीत समाविष्ट झाला होता.त्यापूर्वी तो निजामकडे होता.१७ व्या शतकात नावारूपाला आलेले पवार घराणे हे मूळ सुपे येथील होते.नंतर साबाजी पवार,कृष्णाजी पवार हे संभाजीच्या काळात होते.पुढे बुवाजी पवार ताराराणीच्या यांच्या काळात होते.पवारांचे चारही जण मराठ्यांच्या साम्राज्याच्या विस्तारात होते.पुढे मराठ्यांचे विस्तार झाला त्यात धार आणि देवास दोन शहरे दिली होती.पुढे तुकोजी आणि जीवाजी हे दोन भाऊ देवासला गेले होते.जीवाजिकडे कोपरगावाची वतनदारी मिळाली होती.त्या काळी सरदारकी गेली तरी वतने जप्त होत नव्हती.पवारांचे देवासला राज्य होते तर वतन जिवाजीला कोपरगावचे वतन दिले होते.जेऊर कुंभारी हेही वतन होते.तेथे पवार सरकार म्हणून वाडा होता.आजही त्याचे अवशेष आपल्याला आढळून येत आहे.त्यांचे आणि छत्रपतीं शिवाजी महाराज आणि पुढील पिढ्यांचे रक्ताचे संबंध होते.त्यांची मुलगी छत्रपती घरात दिली होती.जेऊर कुंभारी येथे आजही मराठा साम्राज्याच्या काळात पवार सरकार यांनी बांधलेले सोमेश्वर महादेव मंदिर पहायला मिळत आहे.त्यांना तेथे हत्ती,घोडे आदींचा मान होता.अर्धा एकरात त्यांचा वाडा होता.आज त्याचे त्या ठिकाणी अवशेष आहे.जेऊर कुंभारीला एक पवार सरदारांची समाधी आहे.जेऊर कुंभारी येथील सोमेश्वर मंदिरात एक शिलालेख आहे.त्यात त्यांनी (सरदारकी असताना जी पदवी कायम राहील अशी) मोकादम (म्हणजे आम्ही येथील पाटील) आहे असा त्यात उल्लेख केला आहे.काळानुरूप राजे पद गेले, सरदारक्या गेल्या मात्र त्याकाळी वतन जात नव्हते.त्यामुळे त्या काळी सरदार वतन मागत असत.कारण ते सर्व पदे गेली तरी मात्र वतन टिकून राहत असल्याने त्याचा आग्रह जाणीवपूर्वक धरत असत.म्हणूनच आज वर्तमान पाटीलकीचा मान आज टिकून असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.जेऊर कुंभारी येथील वतनाचा कारभार कोपरगाव येथील नरोडे पाटील हे त्यांच्या पाटीलकीचा कारभार पाहत असत.त्यांच्या वाड्याच्या शेजारी आजही नरोडेचा वाडा असल्याची यांनी आठवण करून दिली आहे.आजही त्याचे वंशज आज कोपरगाव येथे राहत असल्याचे सांगितले आहे.

   दरम्यान मराठेशाहीचा झेंडा पाकिस्तानातील अटकेपार फडकवणारे राघोबा दादा यांची माहिती देताना ते म्हणाले की,”बाजीराव पेशवे यांचा थोरला मुलगा नानासाहेब पेशवे हे होते आणि त्या पेशव्यांचा धाकटा भाऊ राघोबा दादा हे होते.त्याचे आवडते गाव कोपरगाव होते.कोपरगाव बेट परिसरात त्यांनी मोठा वाडा बांधला होता.तो इंग्रज राजवटीत आता पाडला गेला आहे.कोपरगावच्या पश्चिमेस साधारण सहा कि.मी.अंतरावर दक्षिण वाहिनी गोदावरी नदी काठी हिंगणीत मोठा अर्धवट वाडा बांधला होता.(तो अंतिम काळात अपूर्ण राहिला आहे.)मात्र त्यांचे इच्छेनुसार त्याचा अंत्यविधी त्या ठिकाणी केला आहे.त्याच वाड्यात राघोबा दादा यांची आजही समाधी दिसून येत आहे.कोपरगाव तालुक्यात मोठे ऐतिहासिक ठिकाणे आहेत परंतु अनेकाना ती माहिती नाही याचा त्यांनी खेद व्यक्त करून एक उदाहरण दिले आहे.त्यात त्यांनी आपण पुण्यात असताना कोपरगाव निवासी अनेकाना आपण विचारले तेथे रघुनाथ दादांचा वाडा आहे का ? तर बऱ्याच जणांना ते माहिती नाही असे दिसते.त्यावेळी डेंगळे म्हणाले,”तुम्हाला केवळ काळे-कोल्हेच माहिती आहे का ? (हशा) कोपरगाव शहरात आणि परिसरात इतिहासाची मोठी संपत्ती म्हणजे पेशव्यांचे वाडे सुस्थितीत आहे.आनंदीच्या मृत्यूनंतर ८-१० वर्षे कोपरगावात राहत होते.त्यावेळी कोकमठाण,संवत्सर,शुक्लेश्वर या मंदिरात राहत.आनंदीबाई स्वतः पुराणिक कुटुंबात जात असत.दुसरा बाजीराव बालपण कोपरगाव येथे गेले चिमणाजी आणि दुसरा बाजीराव पेशवे यां दोघांचा जन्म या ठिकाणी जन्म झाला होता.अमृतराव हा दत्तक घेतला होता.दुसरा बाजीराव हा पेशवा झाल्यावर बऱ्याच वेळेला कोपरगावात येत,वावीचे शाहीर पराशराम यांचे पोवाडे ऐकायला जात असत.(तो छंदि फंदी होता) पेशवाईची अखेरच्या टप्प्यात कोपरगावात शेवटची लढाई झाली त्यात अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले त्याची कोपरगावात आजही अनेक थडगी असल्याची माहिती दिली आहे.

   त्यावेळी पवार सरकारची माहिती देताना ते म्हणाले की,” मूळ पुरुष यशवंतराव पवार हे पानिपत मध्ये वीरगती प्राप्त झाले होते.त्याकाळी महादजी शिंदे हे नाव फार मोठे होते.त्यांनी उत्तर भारतात मराठेशाहीचे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं.अब्दालीच्या पानिपत लढाई नंतर १०-१२ वर्षात पुन्हा हे वर्चस्व प्राप्त केले होते.त्यांना तत्कालीन बादशहा यांनी ‘ वकील ए मुतलक’ (दिल्लीचे संरक्षणकर्ते) हा पुरस्कार दिला होता.)१७८५ ला दिल्ली परत वारीचे (कोपरगाव) शिंदे पाटलांनी जिंकली होतीअशी आठवण करून दिली आजही कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शूर सरदार रायाजी शिंदे यांचे वारस राहत आहेत.त्यांनी त्या काळी अलिगड हा किल्ला पुन्हा जिंकला होते.महादजी शिंदे यांचे रायाजी शिंदे हे अंत्यंत विश्वासू सरदार होते.गुलाम कादिरला रायाजी यांनी ठेचून मारले होते.१७९५ ला रायाजी शिंदे आणि निजामाची लढाई खर्डा येथे झाली होती.त्यावेळी रायाजी शिंदे यांना वारीला जहागिरी दिली होती.त्यांनी येथे मोठी पेठ वसवली होती.वारीत दोन मजल्याच्या वाडा आहे.ही ग्वाल्हेरचे शिंदेशी संबंधित आहे.कोपरगावचा मूळ मारवाडी हे वारीचे असल्याची आठवण करून दिली आहे.हेच वारीचे शिंदे ग्वाल्हेरच्या शिंदेचे घराण्याचे वंशज आहे.त्याचे बरेच सबल पुरावे असल्याचा त्यांनी दुजोरा दिला आहे.हे सांगताना त्यांनी शेवटी इंदूर घराण्याच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे बरेच संबंध होते.धारचे पवार यांनी कोपरगावला कायम संबंध ठेवले होते.मुरलीधर कृष्ण मंदिर हे विंचूरच्या सरदारांनी बांधले असल्याची आठवण करून दिली आहे.मराठे उत्तरेला जाताना नेहमी पुणतांबा किंवा कोपरगाव येथेच थांबत असत हे सांगताना त्यांनी स्वतःची निमगाव जाळी येथील डेंगळे घराण्याची शाखा निघोज येथे असल्याचे सांगितले आहे.

   सदर प्रसंगी त्यांनी सोमय्या यांचे मूळ घराणे मालुंजे तालुका श्रीरामपूर येथील आहे.आता ते घाटकोपरला स्थायिक झाले असल्याचे सांगितले आहे.ते वर्तमानात मोठे कारखानदार असून त्यांच्या शिक्षण संस्था आजही कोपरगाव आणि परिसरात आहेत. शारदा स्कूल येथे आपण पूर्वी भेट दिली होती.त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी दहा हजार पुस्तकांचे मोठे वाचनालय असल्याची आठवण करून दिली आहे.त्यांच्या शैक्षणिक शाखा आहे.कोपरगाव तालुका वर्तमानात तर शैक्षणिक  संस्थांचे आगर बनले असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.ही भूमी शूर वीरांची आहे.त्यात के.बी.रोहमारे,नामदेवराव परजणे,सूर्यभान पाटील वहाडणे,मोहनराव गाडे,आदींच्या नावाचा त्यांनी उल्लेख त्यांनी आदराने केला आहे.

   सदर प्रसंगी प्रास्ताविक सुशांत घोडके,यांनी केले आहे तर सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार मंगेश भिडे यांनी मानले आहे.
सुमित डेंगळे यांनी ५.३२ वाजता आपले व्याख्यान सुरू केले तर सायंकाळी ६.४६ वाजता संपवले आहे.त्यावेळी उपस्थित नागरिकांनी सुशांत घोडके यांनी राबवलेली या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close