इतिहास
कोपरगांवचा पानिपत रणसंग्रामाशी काय संबंध,ऐका व्याख्यान!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या (मकरसंक्रांती- १७६१) “शौर्य दिवस” निमित्त पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची ऐतिहासिक माहितीचे इतिहास संशोधक व अहिल्यानगर जिल्हा ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांचे व्याख्यान शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४. वाजता कृष्णाई बॅक्वेट हॉल,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक,कोपरगांव येथे आयोजित केले असल्याची माहिती आयोजक सुशांत घोडके यांनी दिली आहे.

भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती,ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता.तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली.अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला.या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली.जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले होते त्यात अनेक सरकार कोपरगाव शहराशी संबंधित होते.हे बऱ्याच जणांना माहिती नाही त्यासाठी या व्याख्यानाचे प्रयोजन.
पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती,ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता.तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली.अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला.या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली.जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले होते त्यात अनेक सरकार कोपरगाव शहराशी संबंधित होते.त्याची बऱ्याच जणांना माहिती नाही.त्यासाठी कोपरगाव शहरात एक व्याख्यान आयोजित केले आहे.गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ यांचे वतीने श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थान (देवास ज्युनिअर) सोमेश्वर महादेव देवस्थान कोपरगांव,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर जिल्हा,राजे जाधवराव देशमुख ट्रस्ट,सूर्यतेज संस्था,कालांश
राजगिरा लाडू ,चिक्की (गुळ युक्त) कंपनी,साईसेवा एम.आर.आय.व सी.टी.स्कॅन,कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगांवच्या ऐतिहासिक माहितीचे व्याख्यान प्रथमच कोपरगांव येथे होत आहे.

दरम्यान या व्याख्यानात गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगांव नगरीचे पौराणिक महत्त्व,शिवकालीन घराण्याचे वारसांची माहिती,अटकेपार योध्दा श्रीमंत राघोबादादा पेशवा यांचे कोपरगांवातील उत्तरार्ध,पानिपतच्या रणसंग्रामातील सरदार यशवंतराव पवार यांचा पराक्रम,पेशवाईत स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत कोपरगांव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कार्य,कोपरगांव येथील वास्तव्यात आनंदीबाई पेशवा यांची रोजनिशीतील माहिती,राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव यांची कोपरगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाऊबंद कोपरगांव तालुक्यात नेमके कोठे वास्तव्यास होते.महादजी शिंदे यांच्या आदेशानुसार आग्राच्या किल्ला जिंकून आणणारे कोपरगांव तालुक्यातील घराणे,यासह कोपरगांवातील ऐतिहासिक माहितीचा खजिना या व्याख्यानातून उलगडणार आहे.

या व्याख्यानासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदवून प्रवेशिका श्री गणेशा काॅम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट वेदिका शाॅपिंग सेंटर,कोपरगांव मो.-9595575257,घोडके पेन सेंटर बिरोबा चौक,कोपरगांव मो.-9423166103,साई क्लिनिक निवारा,जुना टाकळी रोड,कोपरगांव मो.9271538338,मे.पांडुरंग विसपुते सराफ,बालाजी मंदिर,सराफ बाजार, कोपरगांव मो.-9766626764, अनिल कोल्ड्रिंक्स सेंटर व्यापारी धर्मशाळा समोर,कोपरगांव.मो.-9960815959, यशश्री बॅगल्स अँड काॅस्मेटिक्स पाॅवर हाऊस समोर,कोपरगांव. मो.-9765934983 येथे उपलब्ध असणार आहे.कोपरगांवातील ऐतिहासिक माहितीचे प्रथमच होणाऱ्या व्याख्यानाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ व सुशांत घोडके यांनी शेवटी केले आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

