जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करा-…या संघटनांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नुकतेच पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आज तालुक्यातील विविध महसुली संघटनाच्या वतीने तहसीलदार यांचे विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’ करण्यात आले आहे.

शिर्डीत प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देताना महसुली संघटनांचे पदाधिकारी.

“आगामी दहा-पंधरा दिवसात या प्रकरणी संबंधीत पोलीस अधिकारी,तक्रारदार,ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यावर हजर नसलेले अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, न केल्यास आपण तीव्र स्वरूपाचे बेमुदत आंदोलन करणार आहे”-योगेश पालवे,महसुली अधिकारी/कर्मचारी संघटना कोपरगाव.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यामुळे या प्रकरणाने तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सुरु असलेले आंदोलन व त्यातील सहभागी अधिकारी,कर्मचारी.

दरम्यान या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार कोणतंही तथ्य नसताना हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आरोग्य संघटना पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याआधीच त्यांनी नगर येथे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून घेतले हॊते.दरम्यान या आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांना आपला वेळ आणि पैसे वाया घालवावा लागला आहे.

दरम्यान काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास आमच्या प्रतिनिधीने तहसील कार्यालयात भेट दिली असता एखादं अपवाद वगळता बऱ्याच टेबलवर कर्मचारी दिसून आले नाही.म्हणजेच तहसील कर्मचाऱ्यांनी ‘अघोषित कामबंद आंदोलन’ केले होते असे म्हणायला जागा आहे.तर आज पासून,’लक्षणीय उपोषण’ करण्याचे जाहीर केले होते.त्या नुसार आज सकाळी ९.३० वाजे पासून सदर आंदोलन सुरु करण्यात आले होते.

त्यात महसुली अधिकारी/कर्मचारी संघटना,मंडलाधिकारी संघटना,तलाठी संघटना,कोतवाल संघटना आदी चार संघटनांचा प्रामुख्याने समावेश होता.तर या खेरीज तालुक्यातील प्रहार जनशक्ती संघटना,रेशन दुकानदार संघटना,सेतू केंद्र चालक संघटना,कोपरगाव शहर मनसे,ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटी,भोई समाज युवक सेवा संघ,वंचित बहुजन आघाडी,तालुका पोलीस पाटील संघटना आदींचा समावेश होता.तर याशिवाय तालुक्यातील लौकी,भोजडे,सडे,भोजडे,दहिगाव बोलका,जेऊर पाटोदा,मढी बु.डाऊच खु,डाऊच बु.टाकळी,चासनळी,धारणगाव,बोलकी,वेस-सोयगाव आदी ग्रामपंचायती तर ओगदी,उक्कडगाव,शिंगणापूर सोसायटी,आदींनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला असल्याची माहिती दिली आहे.

सदर आंदोलनास महसुली अधिकारी/कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश पालवे,मंडलाधिकारी संघटनेचे अध्यक्ष बी.बी.गोसावी,तलाठी संघटनेचे अध्यक्ष योगेश तांगडे,कोतवाल संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ महाजन,मंडलाधिकारी मच्छीन्द्र पोकळे,तलाठी श्री शिरसाठ,किशोर गटकळ,श्री इंगळे,श्री कांगणे,बाळासाहेब कोळगे आदिसंह बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार कोणतंही तथ्य नसताना हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आरोग्य संघटना पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याआधीच त्यांनी नगर येथे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून घेतले हॊते.दरम्यान या आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांना आपला वेळ आणि पैसे वाया घालवावा लागला आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close