जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

जनआक्रोश आंदोलन म्हणजे आगामी जि.प.आणि पं.स.वर डोळा ठेऊन केलेला उद्योग-टीका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘जनआक्रोश आंदोलन’ हा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतपेटीवर डोळा ठेऊन केलला ‘नसता उद्योग’ असून कोल्हेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे राहिले आहेत असा शालजोडा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांनी लगावला आहे.

‘जनआक्रोश आंदोलन’ करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का ? याचा जरा खाजगीत कानोसा घ्या.बालहट्ट पुरविण्यासाठी कार्यकर्ते नाईलाजास्तव सहभागी झाले होते का ? याचीही माहिती घ्या.त्यावेळी तुम्हाला समजेल की,”जिल्हा परिषद,पंचायत समिती,आमदारकी तुमच्याकडे का नाही.त्यामुळे जर तुम्हाला खरोखर जनतेची एवढीच काळजी असेल तर महागाईच्या प्रश्नावर आक्रोश करा”-कारभारी आगवन,माजी उपाध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना.

कोपरगाव येथे माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी व त्यांच्या युवराजाने आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयावर विवं ओढ मागण्यासाठी,”जनआक्रोश आंदोलनाचा देखावा उभा केला होता त्यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले असून यावर कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”कोल्हेंचे शेतकऱ्यांविषयी असलेले पुतना मावशीचे प्रेम ज्यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी राज्यव्यापी शेतकरी संप मोडला त्यावेळी कोपरगाव तालुका,जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्याने पाहिले आहे.आजपर्यंत त्यांनी केलेले आंदोलन बोलायचे एक आणि करायचे एक अशा पद्धतीने करून जनतेला वेड्यात काढायचे काम त्यांनी आजवर केले आहे.कोल्हेंनी केलेल्या खडा आंदोलनाचा उलटा इतिहास सांगून जनतेला वेड्यात काढले जात आहे.एकीकडे खडा आंदोलन करायचे,रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल अशी भाषा करायची आणि दुसरीकडे स्वत:च धरणाचे दरवाजे उघडायला जायचे असा दुटप्पीपणा केवळ कोल्हें कुटुंबालाच जमला आहे.त्यामुळे त्यांच्या आंदोलनावर नागरिकांना कधीच विश्वास नसतो.कार्यकर्त्यांना जनआक्रोश आंदोलनाला बोलावून ग्रामपंचायत आणि सोसायट्यांचे विषय घ्यायचे.जिल्हा परिषद,पंचायत समिती,आमदारकी नाही याचे रडगाणे गायचे यावरून हा ‘जनआक्रोश’ कशासाठी होता हे सर्वसामान्य जनतेने ओळखले आहे.

जनआक्रोश आंदोलनात पाट पाण्याच्या प्रश्नावर दिशाभूल करणाऱ्या कोल्हेंनी मागील पाच वर्ष कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रातून मुंबईला घेतली.शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंतच तर कुठे त्याच्या आतच पाणी देवून शेतकऱ्यांची बोळवण केली त्यामुळे कोल्हेंना आवर्तनाच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही.तुम्हाला जनतेने का नाकारले व तुमच्याकडे सत्ता का नाही याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा उपरोधिक सल्ला आगवन यांनी दिला आहे.

आजही भर उन्हाळ्यात कालव्यांना आवर्तन सूरु आहे हे जनआक्रोश आंदोलनात माजी आमदारांनी कबूल केले आहे तरी देखील आवर्तनाचे प्रश्नावर तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करतात हे जनता जाणून आहे.जनआक्रोश आंदोलन करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का ? याचा जरा खाजगीत कानोसा घ्या.बालहट्ट पुरविण्यासाठी कार्यकर्ते नाईलाजास्तव सहभागी झाले होते का ? याचीही माहिती घ्या.त्यावेळी तुम्हाला समजेल की,”जिल्हा परिषद,पंचायत समिती,आमदारकी तुमच्याकडे का नाही.त्यामुळे जर तुम्हाला खरोखर जनतेची एवढीच काळजी असेल तर महागाईच्या प्रश्नावर आक्रोश करा मात्र बालहट्टापायी बालीशपणा करू नका असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close