जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात इंधन दर वाढीचा निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण देशात इंधनाच्या दरांनी रचलेल्या नव्या विक्रमांनी महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे असह्य झाले आहे. त्यावर केंद्र सरकारकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या रोषाची माहिती केंद्र सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज बुधवार (दि.२०) रोजी कोपरगाव शहर राष्ट्रवादीने सायकल फेरी काढून पेट्रोल पंपाला हार घालून दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे.

वारंवार वाढणाऱ्या इंधन महागाईमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहे.त्याची त्यांना झळ बसत असून स्वयंपाकाच्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले असून महिलाचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांना कोपरगाव शहर राष्ट्रवादीने आज भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी २० ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.अनेक दिवसांनंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर आहे. याआधी सोमवारीही पेट्रोल-डिझेल दर स्थिर होते. पेट्रोल-डिझेल दरात रविवारी ३५.३५ पैसे प्रति लीटरची वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेल दर यावेळी सर्वात उचांकी स्तरावर आहेत.आय.ओ.सी.एल.च्या आज जारी झालेल्या रेटनुसार,दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोलची १०५.८४ रुपये प्रति लीटरने विक्री होत आहे.तर डिझेलची ९४.५७ रुपये प्रति लीटरच्या दराने विक्री होत आहे.त्यामुळे जनतेत अच्छि-खांशी नाराजी पसरली आहे.त्यामुळे वाहतुकदारांनी संपाची तयारी चालवली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावात राष्ट्रवादीने हे सायकल फेरी काढण्याचे ठरवले असून त्याची आज अंमलबजावणी केली आहे.
या इंधन महागाईमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहे.त्याची त्यांना झळ बसत असून स्वयंपाकाच्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले असून महिलाचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांना राष्ट्रवादीने आज भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

सदर प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते श्रीमान गोकुळचंद विद्यालय,श्री छत्रपती संभाजी स्मारक,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक, बसस्थानक ते तहसील कार्यालय अशी सायकल फेरी काढून इंधनाचे लवकरात लवकर कमी करावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले आहे.व केंद्र सरकारचं निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,दिनकर खरे,फकिर कुरेशी,रावसाहेब साठे,जावेद शेख,राहुल देवळालीकर,प्रकाश दुशिंग,वाल्मीक लहिरे,संदीप कपिले,राजेंद्र खैरनार,संदीप सावतडकर,अशोक आव्हाटे,इम्तियाज अत्तार,संतोष वढणे,सागर लकारे,निलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close