जाहिरात-9423439946
आंदोलन

…या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   सावळीविहीर,पोहेगाव व सोनेवाडी या गावांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला राज्य मार्ग ६५ साठी २.२८ कोटी निधी मिळालेला आहे.त्या रस्त्याचा कार्यारंभ आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला असताना या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदार नितीन औताडे यांनी राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम रखडवले असून त्यांना बांधकाम विभागाने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

काकासाहेब जावळे.

 

“आ.आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मिळवून ७० लाख रुपयांचा निधीने विकास कामे केली आहे.तथापि श्री मयुरेश्वर मंदिरासाठी अजूनही ५० लाख रुपये निधी मिळावा यासाठी महायुती शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता परंतु त्यासाठी पोहेगाव ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र आवश्यक होते.मात्र त्यावेळी नितीन औताडे यांनी राजकीय द्वेषापोटी पोहेगाव ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र दिले नाही”-काकासाहेब जावळे,माजी उपाध्यक्ष,कर्मवीर काळे कारखाना.

   कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांचा बोऱ्या वाजला आहे.राष्ट्रीय महामार्ग त्याला अपवाद नाही.अद्यापही नगर मनमाड मार्ग पूर्ण झालेला नाही.शिर्डीचा बाह्यवळण सत्ता पूर्ण झालेला नसताना वापरण्यात आलेल्या झगडे फाटा वडगाव पान रस्त्याची स्थिती तर विचारू नका.जवळके,सायाळे मार्गे शिर्डीचा पालखी मार्गआदी रस्त्यांची कामे सिंहस्थ कुंभमेळ्यात घेणे आवश्यक असताना तो टाळला गेले आहे.धामोरी रस्त्याचे काम पूर्ण होण्याचे आत होत्याचे नव्हते झाले आहे.आ.काळे यांनी किमान रस्ते निकृष्ट झले याची कबुली दिली ही तेवढी समाधानाची बाब.परिणामी त्यांनी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन समज दिली आहे.या पार्श्वभूमीवर काकासाहेब जवळे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

   त्यांनी त्यात पुढे हटले आहे की,”आ.आशुतोष काळे यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून मतदार संघाच्या विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणला असल्याचा दावा करून त्यांनी या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.मात्र पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याचा कार्यारंभ आदेश होवूनही ठेकेदार नितीन औताडे यांनी जाणीवपूर्वक या रस्त्यांचे काम अद्याप सुरु करत नाही.परिणामी पोहेगाव-सोनेवाडीच्या नागरीकांमध्ये मोठी नाराजी आहे.लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात आणि मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळवतात मात्र नितीन औताडे यांच्यासारखे मुजोर ठेकेदार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय स्वार्थासाठी रस्त्याचे काम रखडवून नागरीकांना त्रास देतात हे चुकीचे आहे.अशा ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी का पाठीशी घालत आहे? असा सवाल विचारला आहे.
  
    नागरीकांना दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी आ.काळे यांनी रस्त्यासाठी निधी दिला.निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्याच्या कामाची  कार्यारंभ आदेश ठेकेदार नितीन औताडे यांना देण्यात आला आहे.परंतु आर्थिक स्वार्थाबरोबरच स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नितीन औताडे या ठेकेदाराने रस्त्याचे काम रखडवून पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीरच्या नागरीकांना वेठीस धरीत आहे.तर सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर कातडे ओढले आहे.

   दोन दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत,निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात या प्रकरणी लक्षवेधी मांडण्याचा ईशारा दिला आहे.त्यांच्या या भूमिकेचे नागरीकांनी स्वागत केले आहे.ज्याप्रमाणे दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असेल तर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नागरीकांना चांगल्या रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्या पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याचे ठेकेदार असलेल्या नितीन औताडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी  केली आहे.याशिवाय पोहेगाव-सोनेवाडी-सावळीविहीर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ८ ऑक्टोबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ म्हणजेच एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून दोष दायित्व कालावधी हा २४ महिन्यांचा म्हणजेच रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी दोन वर्ष ठेकेदाराची आहे.परंतु अद्याप पर्यंत मुदत संपूनही रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातच करण्यात आलेली नाही असा आरोप औताडे यांचेवर शेवटी केला आहे.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close