आंदोलन
साखर आयुक्तालयाचे नाव अखेर बदलले !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
स्व.शरद जोशी व तात्मा बाबू गेनू स्मृतिदिन दि. १२ डिसेंबर रोजी संपन्न होत असताना आज याच दिवशी साखर आयुक्तालयाचे नाव ‘ऊस आयुक्त’ असे करावे,अशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली होती ती आज मान्य करण्यात आली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे कापण्यात येतात.‘व्हीएसआय’साठी शेतकऱ्यांचे पैसे आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी देखील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वापरले जातात.मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणतेही स्थान उरलेले नाही.परिणामी ही कपात आता बंद करावी असा सज्जड इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला होता.त्यातं सरकार ठिकाणांवर आले असल्याचे दिसून आले आहे.
साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी व त्यांच्या सहकारी नेत्यांनी केली होती.त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार,असा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे संघटनेने दिला होता.त्यामुळे आज पुण्यात साखर आयुक्तालयात आज नेमके काय होणार याकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.दरम्यान याबाबत आज शेतकरी संघटनेने आज ठरल्या प्रमाणे साखर आयुक्त कार्यालयावर आज हल्ला बोल केला होता.

शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ आज साखर आयुक्तांना भेटले होते.शेतकऱ्यांच्या पैशाच्या जोरावर ही साखर आयुक्तालय ही मोठी इमारत उभी राहिली आहे.आजही या इमारतीसाठी शेतकऱ्यांच्या उसाच्या देय रकमेतून प्रति टन रक्कम कापून घेतली जाते.मात्र येथे शेतकऱ्यांना काय स्थान आहे ? असा जाबसाल रघुनाथ दादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.

त्यावेळी पाटील यांनी,”या इमारतीत महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाचे कार्यालय आहे,तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचेही मोठे ऑफिस आहे.मात्र शेतकऱ्यांसाठी काहीही नाही.शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली जातात असा आरोप केला होता.तथापि या ठिकाणी साखर कारखानदारांना प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे जागा देण्यात येते हे अत्यंत दुर्दैवी आहे.या दोन्ही कार्यालयांचा येथे काय संबंध आहे ? हे दोन्ही कार्यालये आम्ही या इमारतीतून हाकलून देणार आहोत,असा सज्जड इशाराही रघुनाथ दादा पाटील यांनी दिला होता.
दरम्यान राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे कापण्यात येतात.‘व्हीएसआय’साठी शेतकऱ्यांचे पैसे आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी देखील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वापरले जातात.ही कपात आता बंद करावी,अशी आमची आग्रही मागणी त्यांनी केली होती.आजच्या आंदोलनाने मान्य झाली असल्याची माहिती ॲड.अजित काळे यांनी दिली आहे.त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मणराव वडले,आदींसह राज्यातील शेतकरी उपस्थित होते.



