जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविरूध्द उच्च न्यायालयात जाणार-इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकारी यांनी दिलेला जागा खरेदीचा सल्ला झुगारून भाडोत्री जागा खरेदी करून रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायतीशी कोणताही लेखी करार न करताच उपबाजार सुरू करण्याचा घाट घातला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यामुळे जवळके ग्रामपंचायतीने त्या विरोधात पुणे येथील पणन संचालक यांचेकडे अपील केले असून त्या ठिकाणी न्याय न मिळाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांनी दिली आहे.त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“या आधी सन-2000 साली राहाता तालुका स्वतंत्र झाल्यानंतर कोपरगाव बाजार समितीचा उपबाजार राहाता तालुक्यात गेला असून त्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आता ज्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीने संगमनेर तालुक्यात जाण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभा ठराव करून तो मंजूर केला आहे.त्या बाबत विधानसभेत प्रश्न विचारणार असल्याची माहिती एका माजी मंत्र्याने याधीच जाहीर केली आहे.असे असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही उठाठेव का करत आहे असा सवाल विचारला आहे.बाजार समिती यातून कोणते शेतकरी हित साधत आहे”- ऍड,दिलीप लासूरे,कोपरगाव.

   सदरचे सविस्तर वृत्त असे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच मागील महिन्यात वादग्रस्त वार्षिक सभा संपन्न झाली होती.तयत अध्यक्षांनी प्रास्तविक संपताच सभा संपली असल्याचे जाहीर करून आपले हसे करून घेतले होते.काँग्रेसशी संबधित एका शेतकरी माहिती अधिकार कार्यकर्त्याला अनाधिकाराने काळ्या यादीत सामील करण्याचा प्रताप केला होता.शिरसगाव उपबाजार मुरूम प्रकरण तर चांगलेच चर्चेत आले होते.अन्य व्यवहाराचे तर विचारायला नको असे अनेक नमुने असून त्या विरोधात वेळोवेळी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहे.आता त्यांचा पुन्हा एक कारनामा उघड झाला असून त्यांनी जवळके ग्रामपंचायत गेली पंचवीस वर्षांपासून उपबाजार मागणी करत असताना तसा ग्रामसभेचा ठराव घेतला होता.त्यावेळचे सभापती गोपीनाथ केदार,संभाजी रक्ताटे,उत्तमराव औताडे आदींनी सदर ठिकाणी भेटी दिल्या असून सभापती उत्तमराव औताडे यांनी तर पणन विभागाचीची मंजुरी आणली होती.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे पत्र काढून जामीन भाडोत्री घेण्याऐवजी ती त्या ठिकाणी खरेदी करावी असे आदेश दिले होते.त्यातून बाजार समितीचे आर्थिक नुकसान टाळण्याचा सल्ला दिला होता.मात्र तो कृषी उत्पन्न बाजार समितीने टाळला असून रांजणगाव देशमुख या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती केली आहे.शिवाय त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीने अद्याप कृषी उत्पन्न बाजार समितिशी कोणताही दुय्यम निबंधक यांचे समोर प्रत्यक्षात अधिकृत लेखी करार केलेला नाही.या संबंधी अधिकृत माहिती संबधित अधिकाऱ्यांशी विचारली असता त्यांनी “त-त-म-म.. ” झाली आहे.त्यांनी त्याबाबत सविस्तर मौन पाळले आहे हे विशेष ! याबाबत काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी यास नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.त्यामुळे हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे.असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.या मागील करण्याचा शोध घेतला असता याबाबत उपसभापती यांची मुदत संपली असून विद्यमान कोल्हे गटाचे सभापती यांची मुदत संपली असल्याचे माहिती समोर आली आहे.त्यामुळे,”आपल्या कार्यकाळात आपण हा भीम पराक्रम केला” अशी शेखी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांना मिळवायची असल्याचे माहिती समोर आली आहे.

“रांजणगाव देशमुख गावाने संगमनेर तालुक्यात जाण्याचा ठराव घेतला असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याच गावात तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिमारेशेच्या जवळ उपबाजार मंजूर करण्याचा घाट घातला असून त्या विरोधात आपण पुणे येथील पणन संचालक यांचेकडे अपील केले असून त्या ठिकाणी न्याय न मिळाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार आहे”-सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.

   दरम्यान या घटनेमुळे सर्वाधिक योग्य भौगोलिक दृष्ट्या योग्य असलेल्या जवळके ग्रामपंचायत डावलले जात आहे.त्यात हे गाव संगमनेर-कोपरगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून राहाता-सिन्नर तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी असून त्या ठिकाणी सदर गाव चौफुलीवर वसले आहे.या भागातील एखादा दोन अपवाद वगळता बहुतांशी ग्रामपंचायतींनी जवळके या ठिकाणी उपबाजार भरविण्यासाठी वारंवार पसंती दर्शवली आहे.सदर जवळके  ग्रामपंचायतीने कृषी उत्पन्न बाजार समितीस पाच एकर जागा दिली असताना त्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली असून त्यांनी तालुक्याच्या एका कोपऱ्यात संगमनेर तालुक्याच्या सीमारेषेवर भागवतवाडी जवळ जागा एकवीस वर्षाच्या कराराने घेतली असल्याची माहिती माहिती अधिकारात उपलब्ध झाली आहे.त्यामुळे बाजार समितीचे मोठे नुकसान होणार आहे.

   याबाबत आमचे प्रतिनिधीने ऍड.दिलीप लासूरे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या आधी सन-2000 साली राहाता तालुका स्वतंत्र झाल्यानंतर कोपरगाव बाजार समितीचा उपबाजार राहाता तालुक्यात गेला असून त्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आता ज्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीने संगमनेर तालुक्यात जाण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभा ठराव करून तो मंजूर केला आहे.त्या बाबत विधानसभेत प्रश्न विचारणार असल्याची माहिती एका माजी मंत्र्याने याधीच जाहीर केली आहे.असे असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही उठाठेव का करत आहे असा सवाल विचारला आहे.बाजार समिती नेमली कोणासाठी काम करत आहे.कोणते शेतकरी हित साधत आहे असा सवाल विचारला आहे.

   दरम्यान याबाबत जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”रांजणगाव देशमुख गावाने संगमनेर तालुक्यात जाण्याचा ठराव घेतला असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याच गावात तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिमारेशेच्या जवळ उपबाजार मंजूर करण्याचा घाट घातला असून त्या विरोधात आपण पुणे येथील पणन संचालक यांचेकडे अपील केले असून त्या ठिकाणी न्याय न मिळाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे बाजार समितीत बेताल कारभार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

                 ——————————-

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close