आंदोलन
….’ त्या ‘ ग्रामसभेचे चुकीचे इतिवृत्त,कारवाई करा अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायतने घेतलेला ग्रामसभा ठराव बेकायदा असून त्याची चौकशी करावी व दोषी विरूध्द कारवाई करावी अशी मागणी आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात शरद पवार युवा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वर्पे यांनी केली होती.त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी लेखी तक्रार करा चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन देऊन बरेच दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने याबाबत तक्रारदार यांनी संताप व्यक्त केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

रांजणगाव देशमुख येथील ग्रामसभेचा चुकीचा अहवाल लिहिण्यास सांगणाऱ्या इसमा विरूध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.या संबंधी कारवाई न झाल्यास आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचे सुनील वर्पे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या शिवाय या दुष्काळी गावांना पिण्याचे आरक्षण पडलेले नाही.शिवाय पायाभूत सेवा सुविधा पासून हा भाग अद्याप स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटूनही वंचित आहे.परिणामी रांजणगाव देशमुख येथील संतापलेल्या ग्रामस्थानी मागील महिन्यात 17 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित ग्रामसभेत आम्हाला राहाता अथवा संगमनेर तालुक्यात सवाविष्ट करावे असा ग्रामसभेचा ठराव बहुमताने मंजूर केल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तिखट प्रतिक्रिया दिली असून नाकर्ते राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.त्यावर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी,”सदर ठराव मंजूर झाला असल्याचे सांगून तटस्थ मते ग्रामसभेत विचारात घेतली जात नाही” असा थेट खुलासा केला होता.त्यामुळे तो ठराव हा 21 विरूध्द 05 मतांनी मंजूर झाला होता हे उघड झाले होते.त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी आ.काळे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात याचे पडसाद उमटले होते.याबाबत तक्रारदार सुनील वर्पे यांनी या प्रकरणी दाद मागितली होती.त्यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी तुम्ही तक्रार करा आम्ही चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते.मात्र याबाबत शुकशुकाट निर्माण झाल्या असल्याने त्यांनी काल अखेर कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे.व कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यासाठी त्यांनी 17 सप्टेंबर रोजीचे ग्रामसभेचे चलचित्रण पुरावा म्हणून गटविकास अधिकारी यांना सादर केले आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी,”सदर ठराव मंजूर झाला असल्याचे सांगून तटस्थ मते ग्रामसभेत विचारात घेतली जात नाही” असा थेट खुलासा केला होता.त्यामुळे तो ठराव हा 21 विरूध्द 05 मतांनी मंजूर झाला होता हे उघड झाले होते.मात्र त्यानंतर राजकीय दबावातून अधिकाऱ्यांनी घुमजाव केले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यासंबधी ग्रामसभेचा चुकीचा अहवाल लिहिण्यास सांगणाऱ्या इसमा विरूध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.या संबंधी कारवाई न झाल्यास आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचे सुनील वर्पे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे आता मूग गिळून बसणारे अधिकारी काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.



