आंदोलन
…’न्युजसेवा’ पोर्टलच्या बातमीची दखल,रस्ता केला बंद !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि अन्य ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था आणि नेत्यांचे दुर्लक्ष याबाबत,’न्युजसेवा’ वेब पोर्टलवर वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून त्यांनी तातडीने संवत्सर हद्दीतील गोदावरी नदीवरील पुलावरील वाहतूक तातडीने बंद करून ती अन्यत्र वळवली असल्याची बाब उघड झाली आहे.त्यामुळे प्रवाशी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून,’न्युजसेवा’ पोर्टलला धन्यवाद दिले आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई या जुन्या महामार्गावरील संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ‘न्युजसेवा’ या वेब पोर्टलचे धन्यवाद मानले आसून सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने या मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करून हा रस्ता पूर्ववत करावा अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.
नादुरुस्त रस्ते ही उत्तर नगर जिल्ह्यासाठी एक मोठी गंभीर समस्या बनली आहे,ज्यामुळे अपघात,वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयीत वाढ होत आहे.पावसामुळे रस्ते खराब होणे,शहरात अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त पार्किंग,तसेच रस्त्यांच्या बांधकामासाठीचे तंत्रज्ञान आणि अंमलबजावणीतील त्रुटी यांसारखी अनेक कारणे या समस्येमागे आहेत.मात्र नेत्यांचे दुर्लक्ष ही वर्तमानात मोठी समस्या बनली आहे.उत्तर अहिल्यानगर जिल्हा त्याला अपवाद नाही.कोणता रस्ता चांगला आहे अशी म्हणण्याची सोय उरली नाही.नेते आपला माल कमाविण्यात मग्न असल्याचे दिसून येत असून त्यात अधिकारी सामील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.त्यामुळे ‘ लाज ‘ या शब्दाला ‘लाज’ वाटावी असे ही स्थिती तालुक्यात निचांकी राजकीय स्थिती उद्भवली आहे.कोपरगाव तालुक्यात मंजूर रस्ते अन्यत्र जात आहे.त्याचा निधी इतरत्र वर्ग होत आहे.मंजुरीसाठी रस्ते नाकारले जात आहे.त्यामुळे येथील मतदारांना मरण्यासाठी सोडून दिले असे म्हंटले तर वावगे ठरू नये अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे.या विरूध्द नेत्यांची निधी मंजुरीची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहीली की या निधीला कुठे पाय फुटले असा सवाल कोणाही सुज्ञास न पडला तर नवल ! नगर-मनमाड आणि झगडे फाटा ते वडगाव पान याचे उत्तम उदाहरणे निर्माण झाली आहे.

राज्यात कोणतेही सरकार सत्तेसाठी दावा करो.त्यात नगर जिल्ह्यातील नेते आधी मुख्यमंत्री पदाचा दावा करतात आणि त्यानंतर संबधित सरकारमधील भीष्माचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हात ओले करून दुधाची तहान ताकावर भागवली जाते आणि गुमान एखादे मंत्रीपद पदरात पाडून घेतले जात आहे.मात्र जिल्हा विकासाबाबत म्हणाल तर कोणाला काय विचारावे असा सवाल निर्माण होतो.सहकारी साखर कारखानदारीतून सामान्य शेतकऱ्यांना मालक बनविण्याचे गाजर दाखवून त्यांना कधी गुलाम बनवले याचे या सभासद आणि ऊस उत्पादकांना कळले सुद्धा नाही.वर्तमानातआता याच व्यवस्थेतून आता भस्मासुर निर्माण झाले आणि तेच औरंगजेबसारखे सामान्य जनतेला जिझिया कर लादून लुटण्यासाठी सज्ज झाले आहे.यावर आता तरी जनतेने विश्वास ठेवायला हवा अशी स्थिती निर्माण झाली आहे.रस्त्याची तीच स्थिती,पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची तीच स्थिती.जलजीवन योजनेची वेगळी स्थिती नाही.ऊस उत्पादकांना काटा मारून ही मंडळी थकली आहे.आता ही मंडळी त्यांना साखर उताऱ्यात मारत आहे.आणि सभासद केवळ ‘चितळे बंधूं’च्या चिवड्यावर जाम खुश आहे.साहेबाना कर्मवीर,सहकार महर्षी म्हणण्यास बाध्य केले जात आहे.पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार याच काळ्या पैशातून विकत मिळवून जनतेच्या माथी मारले जात आहे.नगरपरिषद नगराध्यक्ष आणि सभापती आदी पदे लिलावाने विकली जात आहे.नगरसेवक पदासाठी जो आपली बुद्धी थेट घरी खुंटीला टांगण्याची न बोलता अट पूर्ण करील त्यांना पुन्हा-पुन्हा उमेदवारी दिली जात आहे.वर्तमान काळ त्याला अपवाद नाही.हे वास्तव वर्तमान काळात निर्माण झाल्याने आता स्वाभिमानी कार्यकर्ते आता निर्माण होण्याचा माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचा काळ आता इतिहास जमा झाला आहे.त्यामुळे समाजाची विण उसवल्याने आता पून्हा एकदा त्याची बांधणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.त्यामुळे तालुक्यातील तरुणांनी या दोन गडाव्यतिरिक्त आता हाती पायतान घेऊन पर्याय शोधला पाहिजे. तरच उज्वल भवितव्य तालुक्याला आणि उत्तर नगर जिल्ह्याला मिळू शकते असो.आता निदान रस्ते विकास महामंडळाला जाग आली हेही नसे थोडके.त्यांनी काल बातमी प्रसिध्दी होताच आपले हातपाय हलवले असून त्या जागी उत्खनक (जे.सी.बी.) नेऊन त्या ठिकाणी एक नाली खोदून तो रस्ता बंद केला असून तो कधी पुन्हा सुरू होणार याबाबत मात्र काहीही माहिती दिलेली नाही.त्यांना लवकरच तशी परमेश्वर सद्बुद्धी देवो हेच मतदार आणि आमच्या हाती आहे एव्हढेच या निमित्ताने.
दरम्यान याबाबत कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई या जुन्या महामार्गावरील संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ‘ न्युजसेवा’ या वेब पोर्टलचे धन्यवाद मानले आसून सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने या मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करून हा रस्ता पूर्ववत करावा अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.
—————————-
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



