जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’तो’ ग्रामसभेचा ठराव ठेवला संदिग्ध,ग्रामस्थांत संताप !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या व रस्त्यांसह विविध पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या रांजणगाव देशमुख येथील ग्रामसभेत मागील महिन्यात संपन्न झालेल्या ग्रामसभेत राजंणगाव देशमुख हे गाव संगमनेर तालुक्यात समाविष्ट होणे बाबत ठराव मंजूर होऊनही तो ठराव सरपंच तथा अध्यक्ष यांनी नाकारल्याने त्याविरुद्ध आपण कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेकडे तक्रार करणार असल्याचे निवेदन तेथील शरद पवार युवा राष्ट्रवादी गटाचे जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडे असलेल्या प्रचंड प्रमाणात असलेल्या नादुरूस्त रस्त्याबाबत नेते आपले तोंड उघडायला तयार नाही.त्यामुळे या मार्गावरील रांजणगाव देशमुख,सह तेरा गावांत अच्छा-खांसा संताप आहे.अनेक कार्यकर्त्यांनी या अन्याया विरोधात निषेधात्मक आंदोलने केली.मात्र प्रशासनाला जाग यायला तयार नाही.त्यामुळे हा सुनील वर्पे यांनी या द्वारे ह संताप व्यक्त केला आहे.

    कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या शिवाय या दुष्काळी गावांना पिण्याचे आरक्षण पडलेले नाही.शिवाय पायाभूत सेवा सुविधा पासून हा भाग अद्याप स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटूनही वंचित आहे.परिणामी रांजणगाव देशमुख येथील संतापलेल्या ग्रामस्थानी मागील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत आम्हाला राहाता अथवा संगमनेर तालुक्यात सवाविष्ट करावे असा ग्रामसभेचा ठराव बहुमताने मंजूर केल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यावर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी,” सदर ठराव मंजूर झाला असल्याचे सांगून तटस्थ मते राजसभेत विचारात घेतली जात नाही” असा थेट खुलासा केला होता.त्यामुळे तो ठराव हा 21 विरूध्द 05 मतांनी मंजूर झाला होता हे उघड झाले होते.

सुनील वर्पे.

   दरम्यान याबाबत प्रत्यक्षात तेथील युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे यांनी या ठरावाची नक्कल मागितली असता त्यात ती त्यांना दि.01 ऑक्टोबर रोजी मिळाली आहे.त्यात ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच जी.ग.मते यांनी,”गावाची लोकसंख्या ही 04 हजार 486 असल्याचे सांगून मतदार संख्या ही 03 हजार 402 अशी असल्याचे आहे.या सभेस एकूण 119 सभासद उपस्थित होते असल्याचे सांगितले आहे ,गावाच्या शासकीय,सामाजिक,शैक्षणिक व विकासात्मक दृष्टिकोनातून एवढ्या अल्पसंख्येने मांडण्यात आलेल्या मतावर आधारित असा मोठा निर्णय घेणे उचित होणार नाही” अशी मल्लिनाथी करून स्वतःची नियमबाह्य व अवैध सुटका करून घेतली आहे.गावाच्या विकासाचा बळी घेतला असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान यात ग्रामसभेत ठरावात सचिवाने बरोबर सुटका करून घेतल्याचे मानले जात आहे.त्यामुळे हे प्रकरण सरपंच महोदय यांना चांगलेच शेकणार असल्याचे ग्रामस्थांतून  बोलले जात आहे.

                 ————————————-

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close