जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या विभागाचा गलथान कारभार,निळवंडे पाण्यापासून अनेक गावे वंचित!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे निळवंडे कालवा कृती समितीच्या लढ्याला यश मिळून काम मार्गी लागून दोन वर्षे उलटली आहे.दोन वर्षात जवळपास पाच वेळा लाभक्षेत्रात असलेले पाझर तलाव भरून दिले आहे.मात्र कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,शहापूर,बहादराबाद,अंजनापुर,सायाळे,मलढोण,दुशिंगपुर आदी गावे पाण्यापासून वंचित राहिली असून याबाबत जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग आपल्या तोंडात मुठाची गुळणी धरून बसला असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  

निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावरील लढा देण्याबरोबरच उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यात लढा दिला आहे.परिणामी आज सात तालुक्यातील दुष्काळी भागातील १८२ गावातील शेतकऱ्यांच्या पाझर तलावात आज पाणी दिसत आहे.मात्र या लाभक्षेत्रात पाणीचोर असलेले ढोंगी नेते मात्र आपल्या काळ्या पैशाचा उन्माद दाखवत त्याचे या पाण्याचे श्रेय लाटत आहेत.मात्र आजही काही गावातील पाझर तलावात पाणी पोहचलेले नाही.याचे कोणालाही काही देणे घेणे असल्याचे दिसत नाही.

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी १४ जुलै रोजी ५५ वर्ष उलटत आले आहे.दरम्यान हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला तो कोणत्या नेत्यांमुळे गेला हे सर्वांना ज्ञात आहे.दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील निळवंडे कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे यांचे मार्गदर्शनाखाली न्यायीक व आंदोलनात्मक पण दुष्काळी जनतेला जागृत करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कालवा समितीला २०१४ अखेर केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून मिळविण्यात व कालवे प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात ऍड.अजित काळे यांच्या मोफत विधी सहाय्याने समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रूपेंद्र काले आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.महाआघाडी सरकारच्या काळात माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या मदतीने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन वर्षात कालव्याच्या कामास १०५६ कोटींचा निधी दिला होता.

निळवंडे धरणाच्या पाण्याने कोपरगाव तालुक्यातील शहापूर पाझर तलाव भरल्यानंतर त्या सांडव्यातील पाणी आमच्या शेतात जात असल्याने त्या पाण्यामुळे आमचे सुमारे ५०० एकर क्षेत्र बाधित होत असल्याची तक्रार पोहेगाव आणि पाथरे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.त्याबाबत त्यांनी नाशिकचे खा.राजाभाऊ वाजे,सिन्नर येथील यांनाही निवेदन दिले आहे.परिणामी हा पाझर तलाव पन्नास टक्केच भरला असल्याने वर्तमानात शेतकऱ्यांना हा तलाव असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला आहे.

  दरम्यान त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावरील लढा देण्याबरोबरच उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यात लढा दिला आहे.परिणामी आज सात तालुक्यातील दुष्काळी भागातील १८२ गावातील शेतकऱ्यांच्या पाझर तलावात आज पाणी दिसत आहे.मात्र या लाभक्षेत्रात पाणीचोर असलेले ढोंगी नेते मात्र आपल्या काळ्या पैशाचा उन्माद दाखवत त्याचे या पाण्याचे श्रेय लाटत आहेत.मात्र आजही काही गावातील पाझर तलावात पाणी पोहचलेले नाही.त्यात कोपरगाव तालुक्यातील जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर,शहापूर,बहादराबाद,अंजनापुर आदी सहा गावे तर सिन्नर तालुक्यातील सायाळे,मलढोण,दुशिंगपुर आदी तीन गावे पाण्यापासून वंचित राहिली असून याबाबत जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग आपल्या तोंडात मुठाची गुळणी धरून बसला असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या बाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत अनेक वेळा भेट दिलेली असताना जलसंधारण विभागाने अद्याप कोणतीही कार्यवाही झालेले नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

   दरम्यान यातील कोपरगाव तालुक्यातील शहापूर हद्दीतील ओस पांढरी येथील पाझर तलावात दोनदा पाणी आले आहे.मात्र येथील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या तलावाचा सांडवा जलसंधारण विभागाने सन-१९८२-८३ साली चुकीचा केला असल्याचा आरोप केला आहे व त्याबाबत पाथरे खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच आणि पाथरे शिवारातील शेतकरी प्रतीक सुनील शिंदे,जालिंदर जगन्नाथ थोरात,हिराबाई जगन्नाथ थोरात,अनिकेत सुनील शिंदे,जालिंदर संपत चोपडे,सोमनाथ सीताराम चौधरी,जयश्री रवींद्र चोपडे,बाळासाहेब पवार आदींनी आदींनी पश्चिम बाजूने चुकीचा झाला असल्याचा आरोप करून शहापूर पाझर तलाव भरल्यानंतर त्या सांडव्यातील पाणी आमच्या शेतात जात असल्याने त्या पाण्यामुळे आमचे सुमारे ५०० एकर क्षेत्र बाधित होत असल्याची तक्रार केली आहे.त्याबाबत त्यांनी नाशिकचे खा.राजाभाऊ वाजे,सिन्नर येथील यांनाही निवेदन दिले आहे.परिणामी हा पाझर तलाव पन्नास टक्केच भरला असल्याने वर्तमानात शेतकऱ्यांना हा तलाव असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला असल्याची तक्रार केली आहे.परिणामी जवळके,शहापूर, धोंदेवाडी,बहादरपूर,बहादराबाद आदी गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहे.तरी कोपरगाव येथील जलसंधारण उपविभाग आणि संगमनेर येथील जलसंपदा विभाग आदींनी तातडीने याबाबत दखल घेऊन या सांडव्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.अन्यथा या गावातील शेतकरी आंदोलन करतील व याची जबाबदारी जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभागावर राहील असा इशारा शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close