आंदोलन
निळवंडे जलपुजनाचे उंदीर तेंव्हा कोणत्या बिळात लपले होते-…यांचा सवाल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
वर्तमानात राहाता,संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निळवंडे धरणाच्या कालव्यांचे जलपूजन करून घेण्यात माजी खा.सुजय विखे,माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर आघाडीवर आहे.मात्र ज्यावेळी अकोले तालुक्यातील ० ते २८ कि.मी.तील कालव्यांचे काम बंद होते व निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात जावून तो लढा लढून २५० पोलिस घेऊन जावून काम सुरू केले तेंव्हा आज जलपूजनाची हौस भागविणारी मंडळी कोणत्या बिळात जावून लपली होती असा सवाल निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नानासाहेब गाढवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये विचारला आहे.

“सन-१९८५ साली लोणीत पाणी परिषद घेऊन जाहीरपणे,”निळवंडे धरण केवळ स्टोअर टँक होईल,याचे कालवे होणार नाही”हे कोणी सांगितले होते ? संगमनेर मधील नेत्याने १९९९ साली पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री पद मिळाल्यावर धरण बांधण्यास घेतले पण कालव्यांना पिंडाला कावळा शिवत नाही तसे हे नेते शिवले नाही.त्यानी लोणीच्या सुरात सुर मिसळला होता हे कसे विसरता येईल”नानासाहेब गाढवे,ज्येष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी १४ जुलै रोजी ५५ वर्ष उलटत आले आहे.दरम्यान हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला तो कोणत्या नेत्यांमुळे गेला हे सर्वांना ज्ञात आहे.सन-१९८५ साली लोणीत पाणी परिषद घेऊन जाहीरपणे,”निळवंडे धरण केवळ स्टोअर टँक होईल,याचे कालवे होणार नाही”हे कोणी सांगितले होते ? संगमनेर मधील नेत्याने १९९९ साली पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री पद मिळाल्यावर धरण बांधण्यास घेतले पण कालव्यांना पिंडाला कावळा शिवत नाही तसे हे नेते शिवले नाही.त्यानी लोणीच्या सुरात सुर मिसळला होता.दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील निळवंडे कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे यांचे मार्गदर्शनाखाली न्यायीक व आंदोलनात्मक पण दुष्काळी जनतेला जागृत करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कालवा समितीला २०१४ अखेर केंद्रीय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून मिळविण्यात व कालवे प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात ऍड.अजित काळे यांच्या मोफत विधी सहाय्याने समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रूपेंद्र काले आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.महाआघाडी सरकारच्या काळात माजी खा.प्रसाद तनपुरे व तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मदतीने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन वर्षात कालव्याच्या कामास १०५६ कोटींचा निधी दिला होता तर भाजप सरकारने २०० कोटी तर “नाबार्डच्या केंद्रीय समितीने मागील काही महिन्यापूर्वी निळवंडे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली होती.त्यानंतर हा नाबार्ड अंतर्गत ८०० कोटींचा निधी दिला होता.त्यामुळे निळवंडे प्रकल्पास आता निधीची चणचण भासणार नाही व कालव्यांच्या अस्तरीकरणासह नलिका वितरण व्यवस्था सुरू आहे.

अकोलेतील एका स्व.नेत्याने व यांच्या परम मित्राने कालव्यांच्या कामाला जगजाहीर आंदोलन करून काम बंदचा खोडा घातल्यावर शेपूट गुंडाळून बिळात जाऊन लपली होती.त्यावेळी निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागून २५० पोलिसांची मदत घेऊन सदरचे काम सुरू केले होते हे इतक्या लवकर विसरतील वाटली नव्हते.
दरम्यान दुसरीकडे उत्तर नगर जिल्ह्यातील नेते (?) मात्र गाडी खाली चालणाऱ्या ग्रामसिंहासारखे कालव्यांचे निर्लज्जपणे स्वतः श्रेय लाटताना दिसत आहे.’अकोलेतील स्व.नेता आमचा परम मित्र आहे” हे सांगणारी ही मंडळी त्यांनी अकोलेतील कालव्यांच्या कामाला जगजाहीर आंदोलन करून काम बंदचा खोडा घातल्यावर शेपूट गुंडाळून बिळात जाऊन लपली होती.त्यावेळी निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागून २५० पोलिसांची मदत घेऊन सदरचे काम सुरू केले होते.त्यानंतर ही मंडळी थांबली नाही.त्यांनी या कामास मंजूर असलेला निधी तापी खोऱ्यात वळवला होता.त्या विरोधात जावून कालवा कृती समितीने छ.संभाजीनगर येथे आंदोलन करून सदर निधीला स्थगिती मिळवली होती.

दि.१० ऑगस्ट २०१४ साली खडकेवाके या ठिकाणी फळ प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यास आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे सभेत पाणी मागणाऱ्या दुष्काळी शेतकऱ्यांवर तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र (!) सुजय विखे यांनी विवेक पाटील नामक बेताल अधिकाऱ्यास हाताशी धरून देशभरच्या मीडियासमोर लाठी हल्ला चढवला होता.साई संस्थानचे मोठी बॅनरबाजीला करून जाहीर केलेले ५०० कोटी रुपये नेमके कोठे गेले आहे ?१८२ गावांच्या दुष्काळी गावांच्या पाणी आरक्षणाबाबत ही मंडळी का बोलत नाही ?
दि.१० ऑगस्ट २०१४ साली खडकेवाके या ठिकाणी फळ प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यास आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे सभेत पाणी मागणाऱ्या दुष्काळी शेतकऱ्यांवर तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचा दिवटा सुजय विखे यांनी विवेक पाटील नामक बेताल अधिकाऱ्यास हाताशी धरून देशभरच्या मीडियासमोर लाठी हल्ला चढवला होता.साई संस्थानचे मोठी बॅनरबाजीला करून जाहीर केलेले ५०० कोटी रुपये नेमके कोठे गेले आहे ? एवढ्या लवकर ही मंडळी विसरली असेल असे आम्हाला वाटले नव्हते.हे कमी की काय याच मंडळींनी शिर्डी आणि कोपरगाव या बारमाही गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शहराला पाणी पळविण्याचा घाट घातला होता.तो कालवा कृती समितीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जावून परतून लावला होता व या मंडळींचे तोंड फोडलं होते.अद्याप दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे पाणी आरक्षित झालेले नाही त्याची मागणी त्यांना ऐकू जात नाही.आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आल्याने ही मंडळी पुन्हा एकदा लोकांना मूर्ख बनविण्यासाठी घराबाहेर पडली आहे आणि गावोगावी जलपुजनाचा कार्यक्रम करत सुटली आहे.
गोगलगाव येथे साहील चौधरी आणि किरण चौधरी हे दोन सख्खे चुलत भाऊ निळवंडे धरणाच्या पाझर तलावात पाडून मृत्यु झाला असताना यांना या ठिकाणी जाण्यास वेळ मिळत नाही तीच बाब कोऱ्हाळे या एका भाऊ-बहिणीच्या बाबत अशीच घडली असताना यांना आगामी निवडणुका पाहून याचे काही सोयरसुतक दिसत नाही.यांना गावोगावच्या दुष्काळी शेतकऱ्यांनी या खोटारड्या नेत्यांना आणि त्यांच्या बगलबच्यांना गावात प्रवेश देता कामा नये व आगामी निवडणुकात संगमेनर येथील नेत्यांना जशी जागा दाखवली तशी राहता तालुक्यात दाखवण्याची वेळ आली असून त्यासाठी कार्यरत होण्याची गरज आहे असे आवाहन कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नानासाहेब गाढवे यांनी शेवटी केले आहे.