आंदोलन
पहलगाम घटना…या शहरात महाआघाडीच्या वतीने निषेध !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता.यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे.त्याचे तीव्र पडसाद राज्यासह कोपरगाव तालुक्यात पाडले असून या घटनेचा बदला घ्यायचा हवा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कोपरगाव शहर बंद व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन होईल.
या घटनेत राज्यातील अतुल मोने-डोंबिवली,संजय लेले -डोंबिवली,हेमंत जोशी-डोंबिवली,संतोष जगदाळे-पुणे,कौस्तुभ गणबोटे-पुणे,दिलीप देसले-पनवेल आदींचा समावेश आहे.तर जखमींत एस बालचंद्रू,सुबोध पाटील,शोबीत पटेल आदी तीन जणांचा समावेश आहे.त्यामुळे देशभर आणि महाराष्ट्र राज्यात हा घटनेचा संताप व्यक्त होत असून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुका याला अपवाद नाही येथे महा विकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान शिर्डी शहरात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.त्यावेळी एकनाथ शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते व त्यांच्यासह त्यांच्या सहकारी पक्षांनी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांना निवेदन दिले आहे.
सदर प्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते संदीप वर्पे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख कलविंदर दडियाल,काँग्रसचे सचिव नितीन शिंदे,मनोज कपोते,ऍड.दिलीप लासुरे,तालुकाध्यक्ष बापू रांधवणे,सुरेश आसने,भावेश थोरात,सुनील वर्पे,निखिल थोरात,स्वप्नील पवार,मजीद पठाण,शुभम शिंदे,रिंकू मगर,दिनेश पवार,ओवेस शेख,अश्फाक शेख,मोबिन शेख,ऍड.सुरेश मोकळं,ऋतुराज काळेआदीसह बहुंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिर्डीचे प्रांत अधिकारी माणिक आहेर व कोपरगाव तहसीलचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले असून त्यात मृत नागरिकांना भरपाई देण्यात यावी,दोषींवर कठोर कारवाई करावी,आगामी काळात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेस सरकारने पुरेसे संरक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.