आंदोलन
आठवड्यानंतर…ते आंदोलन स्थगित,मात्र नेते संभ्रमित !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जलसंपदाच्या नाशिक विभागाने त्यांच्या गोदावरी डाव्या कालव्याच्या रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासींची अतिक्रमणे सात दिवसात काढून घेण्याची नोटीस बजावल्यानंतर सुरू करण्यात आलेले आंदोलन आज आठव्या दिवशी ग्रामपंचायत आणि तहसीलदार,गटविकास अधिकारी आणि दिलेल्या आश्वासनंतर समाप्त करण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अधिकारी वर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

आंदोलकांना कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत राहण्यासाठी प्रस्तावित असलेल्या जागेचा गट क्रमांक नमूद नव्हता.त्यावरून मतमतांतरे झाले असल्याचे दिसंत होते.त्यावरून सरळसरळ दोन गट पडले असल्याचे दिसून येत होते.त्यावरून सदर आंदोलन मागे घ्यायचे की नाही यावर बराच काथ्याकूट करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना अमलात आणत असते.या योजनांमध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना- २०२४ ही योजना अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही अशांसाठी सरकारने सुरू केली आहे.यामुळे त्यांना झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहावे लागते.या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजना सुरू केली आहे.यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत मिळते.मात्र रवंदे ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी कलाव्यालगत रहिवास असलेले आदिवासी बांधव यास अपवाद ठरले होते.त्यांना जलसंपदा विभागाने नोटीस काढून आपली छप्परवजा घरे सात दिवसात काढून घेण्याचे फर्मान धाडले होते.परिणामी तेथील नागरिक हवालदिल झाले होते.त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आपल्या शिकल्या सावरलेल्या तरुणांना हाताशी धरून सरकारच्या या निर्णयाविरुद्ध दंड थोपटले होते व कडाक्याच्या उन्हात आपले प्रपंच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून त्याच ठिकाणी स्वयंपाक करून आपला संसार थाटला होता.परिणामी तालुका प्रशासन हैराण झाले होते.त्यांनी त्यांना सलग सात दिवस आपल्या परीने समजावून सांगितले होते.मात्र त्यांनी,”किसि की एक ना सुनी”.त्यासाठी रवंदे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तहसीलच्या उंबऱ्याला माती कमी केली होती.तरीही मार्ग निघत नव्हता.अखेर आज सदर ग्रामपंचायत ज्या गटाच्या ताब्यात आहे त्या गटाच्या नेत्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनस्थळी आपली पायधूळ झाडली होती व प्रमुख अधिकारी यांना बोलावले होते.त्यांनी ग्रामपंचायतीचा मासिक ठराव बोलावून सदर प्रश्न मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीने ठराव दिल्याने आंदोलन समाप्त झाले असल्याचे कळवले आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने सदर ठिकाणी भेट दिली असता तेथील कार्यकर्त्यांचे समाधान झाले असल्याचे दिसत नव्हते.आंदोलकांना कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत राहण्यासाठी प्रस्तावित असलेल्या जागेचा गट क्रमांक नमूद नव्हता.त्यावरून मतमतांतरे झाले असल्याचे दिसंत होते.त्यावरून सरळसरळ दोन गट पडले असल्याचे दिसून येत होते.त्यावरून सदर आंदोलन मागे घ्यायचे की नाही यावर बराच काथ्याकूट करण्यात आला आहे.मात्र सरते शेवटी आंदोलनकर्त्यांच्या मागणी पत्रात ”नमूद असून त्यावरून संदर्भ देऊन सदर ठराव दिला असल्याने सदर मुद्दा निकाली काढला असल्याचे दिसून आले आहे.