जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

लाचखोर तलाठ्यास वाचविण्यास तलाठी संघटना सरसावली…!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)
 

   कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी लाच घेताना पकडले असताना लाच लुचपत विभागाने सदर गुन्हा हा सदोष दाखल केला असल्याचा आरोप करत आज तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असल्याचे दिसून आले आहे.

          

दरम्यान गुन्हा दाखल झालेला धारणगाव येथील तलाठी धनजंय पऱ्हाड हा अहील्यानगर जिल्हा तलाठी संघटनेचा जिल्हा संघटक असल्याचे त्यांच्या संघटेनेच्या लेटर हेडवरून दिसून येत आहे.त्यामुळे बहुधा संघटना या आंदोलनात उतरली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.उद्याही सदर कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांच्या प्रतिनिधीने दिली आहे.

  कोपरगाव तालुक्यात महसूल,पोलिस अधिकारी आणि वाळूचोरांनी गोदावरी नदी उजाड केली असून अद्यापही प्रशासन वाळू उपसा थांबविण्यास तयार नाही.त्यामुळे शेती व्यवसाय उजाड होणार होत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.वर्तमानात माहेगाव देशमुख,सूरेगाव,मायगाव देवी आदी तीन वाळू डेपो सुरू असून यात महसूल,पोलिस आदी घटकांचा मोठा आर्थिक घोटाळा सुरू असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहे.त्यातच मागील आठवड्यात शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी मोठे धाडस करून स्थानिक महसुली अधिकाऱ्यांना उघड करण्यासाठी धाड टाकून काही वाळूचोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यातून भलताच प्रकार उघड झाला असून पेटलेल्या वाळूचोरांना भलताच चेव आला असून त्यांनी महसुली अधिकाऱ्यांना अडकविण्यासाठी मोठे षडयंत्र सुरू केल्याचे उघड झाले आहे.आपला वाळू चोरीतील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी फिर्यदिकडे लाच मागितली असताना त्याची खबर अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केलेल्या कारवाईत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी यांना दोन दिवसापूर्वी लाच घेताना पकडले होते.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.

  

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील एका वरिष्ठस्तर प्रमुख आरोपीने स्वतःची या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी त्याने दुसऱ्या वाळूचोरांची मदत घेतली असून यातील फिर्यादीचे अपहरण करून मोठी आर्थिक तडजोड केली असल्याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.त्यामुळे हा गुन्हा दाखल होण्यास तब्बल बारा तासांचा कालावधी लागला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे यात वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

  या प्रकरणी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर गुन्हा हा सदोष दाखल केला असल्याचा आरोप करत आज सोमवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असल्याचे दिसून आले आहे.

    दरम्यान यातील आरोपी धनंजय पऱ्हाड याने फिर्यादी शी लाच घेण्यासाठी कोणताही संपर्क केला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.मात्र त्यास जाणीवपूर्वक गुंतवले आहे.सदर घटनेतील फिर्यादी हा मोठा वाळूचोर असून तो वारंवार अशा घटना घडवून आणत आहे.वाळूचोरीस सहकार्य केले नाही की खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. आम्ही दोषी असेल तर जरूर कारवाई करा मात्र दोष नसताना अडकवणे ही बाब गंभीर असल्याचा संघटनेचा आरोप आहे.यातील आरोपी  हा रक्कम घेंण्याची सूचना केली जात असताना तलाठी पऱ्हाड यांनी त्यास नकार दिला असताना कारवाई व्हावी ही गंभीर बाब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  दरम्यान गुन्हा दाखल झालेला धारणगाव येथील तलाठी धनजंय पऱ्हाड हा अहील्यानगर जिल्हा तलाठी संघटनेचा जिल्हा संघटक असल्याचे त्यांच्या संघटेनेच्या लेटर हेडवरून दिसून येत आहे.त्यामुळे बहुधा संघटना या आंदोलनात उतरली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.दरम्यान उद्याही बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांच्या प्रतिनिधीने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

कामबंद आंदोलनात सहभागी महसूल कर्मचारी दिसत आहे.

   सदर प्रकरणी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले आहे.त्यावर श्रीमती ए.एस.निर्मळ,श्रीमती व्हीं.व्हि.कोल्हे,पी.एन.वाडेकर,डी.बी.विधाते,व्ही.के.दुकळे,आर.एम.वानखेडे,इसळ एस.जी.मीनल मेंठे,एस.आर.वानखेडे,बी.एस.मधे,एस.एस.ढुमणे,डी.टी. कातकडे ,जे.एस.शिरसाठ,पोहेगाव येथील मंडलाधिकारी कैलास खाडे,तलाठी किशोर गटकळ,जी.बी.खैरनार आदीसह बहुसंख्य तलाठी आणि कर्मचारी आदी बहुसंख्य आंदोलकांच्या सह्या आहेत.                   

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील एका वरिष्ठस्तर प्रमुख आरोपीने स्वतःची या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी त्याने दुसऱ्या वाळूचोरांची मदत घेतली असून यातील फिर्यादीचे अपहरण करून मोठी आर्थिक तडजोड केली असल्याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.त्यामुळे हा गुन्हा दाखल होण्यास तब्बल बारा तासांचा कालावधी लागला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

   याबाबत आमच्या प्रतिनिधीने ए.सी.बी.च्या तपासी अधिकारी छाया देवरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी हा आरोप फेटाळला असून कोणताही गुन्हा दाखल होताना किमान इतका वेळ लागत असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे या गुन्ह्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.आता वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close