जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

रब्बी पिकांना विजेचा फटका,आंदोलनाचा इशारा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  वर्तमानात पाऊस चांगला झाला असल्याचे शेतकरी रब्बी पिके उभारून त्याला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असताना नेमकी वेळ हेरून महावितरण कंपनीने आपल्या लीला दाखविणे सुरू केले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे.कांदा लागवड धोक्यात आली असून गहू आणि ज्वारी,हरभरा आदी पिके जळून चालली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून शेतकरी अरुण चंद्रे यांनी महावितरण कंपनीविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.


“विजेच्या तुटवड्याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केले तर ते उचलत नाही.उचलला तर ३३ हजार के.व्हि.ए.वरूनच वीज बंद असल्याचे साचेबंद उत्तर मिळते.त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे”-अरुण चंद्रे,ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच,मळेगाव थडी.

   महावितरण कंपनीच्या बेताल व भोंगळ कारभारामुळे नागरिक व्यावसायिक वैतागले असून महावितरण कंपनी आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या ग्राहकांना पूर्व सूचना न देता केंव्हाही वीज घालवत असून केंव्हाही वीज प्रवाह सोडत असल्याने अनेकांना या लहरी पणाचा फटका बसत आहे.विशेषतः याचा फटका रब्बी पिकांना बसत असून या खेरीज खरीप पिकांना जेंव्हा पाण्याची तीव्र गरज असताना त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.त्यामुळे ग्रामस्थ,महिला,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी लहान बालके आदी घटक वैतागले असून त्या विरोधात आज चंद्रे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

त्यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे की,वर्तमानात महावितरण कंपनी शेतकऱ्यांना दिवसा ०८ तास वीज देण्याचे धोरण ठरवले आहे.मात्र ती दिवसा केवळ दोन तास दिली जात आहे.सिंगल फेज मोटारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.ते शेतकरी रात्री पाणी भरत नाही परिणामी दिवसा कमी दाबाने वीज पुरवठा होता आहे.
या पूर्वी कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांना व शेतकऱ्यांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा-पंचाळे येथील महावितरण कंपनीचे सबस्टेशन वाजत गाजत उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या आधी केले होते.मात्र अद्याप त्याचा दाब विभाजन केले असल्याची कोणतीही बातमी दिसत नाही परिणामी त्याचा फटका कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,सुरेगाव,रवंदे धामोरी आदी भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.मोठ्या अपेक्षेने उभारलेले कांदा आणि ज्वारी,गहू,हरभरा आदी रब्बी पिके जळून जावू लागली आहे.कांद्याची लागवड करून झाली तरी चार ते पाच दिवस पाणी शेतकरी देऊ शकत नाही हे वास्तव आहे.महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केले तर ते उचलत नाही.उचलला तर ३३ हजार के. व्हि.ए.वरूनच  बंद असल्याचे साचेबंद उत्तर मिळते.त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

   या भागातील शेतकऱ्यांनी मळेगांव,रवंदे आदी फिटर एक करण्याची मागणी करूनही उपयोग झाला नाही अशी या भागातील शेतकऱ्यांची तक्रार आहे.तीच बाब धामोरी,सांगवी या फिटर ची झाली आहे.त्यामुळे ०८ तास ही फार दूरची  गोष्ट झाली आहे.साधे ०२ तास वीज मिळत नाही हे वास्तव उघड झाले आहे.त्यामुळे नियमित वीज भरणारे शेतकरी गुन्हेगार ठरतात की काय असा सवाल निर्माण झाला आहे.त्यातच निवडणुकीत फडणवीस यांनी वीज बिले माफ करणार अशी घोषणा केल्याने आगामी काळात ०२ तास वीज मिळणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.वर्तमानात विहीर,विंधन,नदी,नाले आदींना मोठे प्रमाणावर पाणी असूनही शेतकरी पाण्याचा वापर करू शकत परिणामी शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

   सरकारने शेतकऱ्यासाठी कुसुम सोलर योजना आणि शेती पंपासाठी मागेल त्याला वीज देण्याची घोषणा केली असली तरी त्यात त्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत (विहिर,शेततळे,बोअरवेल इ.) उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीजपुरवठा देण्यात आला नाहीये असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार असल्याची खूंटी मारून ठेवली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था,”आई भीक मागू देईना आणि बाप पोट भरू देईना” अशी झाली असल्याची कोपरखीळ शेवटी अरुण चंद्रे यांनी शेवटी मारली आहे.त्यामुळे ही वर्तमान सत्ताधारी यांना घरचा आहेर मानला जात आहे.याला विद्यमान लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे हे दखल घेणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close